शिर्डी/प्रतिनिधी ः महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने तसेच खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून राहाता शहराच्या विविध विकास

शिर्डी/प्रतिनिधी ः महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने तसेच खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून राहाता शहराच्या विविध विकास कामांकरिता नगरपरिषदेला 14 कोटीचा निधी मिळाला असून लवकरच या विकास कामांना सुरुवात करून पावसाळ्यापूर्वी हे कामे तात्काळ पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी दिली.
राहाता शहरासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांनी एका काळी टपरीचे शहराला म्हणून ओळखले जाणार्या राहाता शहराला राज्य शासन नगर विकास विभाग माध्यमातून सातत्याने विकास कामांकरिता भरीव असा निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले त्यामुळेच राहाता शहराची ओळख आता मॉडेल सिटी म्हणून होऊ लागली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत दलित वस्ती साठी 1 कोटी व या ठिकाणी विविध रस्ते काँक्रीकरण करण्यासाठी 47 लाख नगरउद्यान निधी अंतर्गत 52लाख नगर विकास विभाग अंतर्गत नागरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत खटकळी दशक्रिया विधी घाट विकास कामासाठी 2 कोटी 25 लाख शहरातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे 5 कोटी व मुख्य चौका चौकात शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता 65 लाख खर्चाचे सीसीटीव्ही कॅमेरे, वैशिष्ट्यपूर्ण विशेष रस्ते अनुदान योजनेअंतर्गत 1 कोटी 85 लाख विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत शहरातील विविध रस्ते डांबरीकरण व खडीकण कामासाठी 6 कोटी पिंपळवाडी रोडसाठी 2 कोटी वेगवेगळे योजनेतून निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच खासदार सुजय विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून शहराच्या विकास कामांकरिता 1 कोटी 25 लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व हुतात्मा चौक सुशोभीकरण करणे, शहरात विविध भागात सीडी वर्क, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात पावसाळ्यात नेहमी पाणी जाऊन व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होते व्यवसायिकांची नुकसान टाळण्याकरिता या ठिकाणी नवीन गटार योजनेचे काम हाती घेतले जाणार आहे. या बरोबरच शहरात विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट पोल उभारणे व हाय मॅक्स बसवणे घरकुल जागेत चैनलिंग कंपाउंड करणे, शहरातील विविध रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे अशा शहरातील विविध भागात विकास कामात करिता व सुशोभीकरणासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खा. सुजय विखे पाटील यांच्या सूचनेवरून लवकरच या सर्व योजनेचे कामे सुरू करून गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी आहेर यांनी माहिती दिली.
COMMENTS