Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेकडून महाराष्ट्राला 13 हजार 539 कोटींची निधी

ठाणे : रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला 2023-24 या वर्षात तब्बल 13 हजार 539 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच म

सभापती धनखड यांच्याविरूद्ध अविश्‍वास प्रस्ताव ;सोरोस-अदानी प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
अंगणवाडी सेविकांचे राज्यस्तरीय आंदोलन
बीडमधील हिंसाचार पूर्वनियोजित

ठाणे : रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला 2023-24 या वर्षात तब्बल 13 हजार 539 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राला भरीव निधी उपलब्ध झाला असून, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. राज्यातील 123 रेल्वे स्टेशनचा अमृत स्टेशन म्हणून विकास होईल. तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, ठाणे रेल्वे स्थानकांसह विविध स्थानकांचा 4 हजार 962 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास केला जाणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला विक्रमी निधी उपलब्ध केला, याबद्दल भाजपाचे आमदार व प्रदेश प्रवक्ते निरंजन डावखरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. 2009-14 या काळात महाराष्ट्राला केवळ 1 हजार 171 कोटी उपलब्ध झाले. तर केवळ 2023-24 या वर्षात 13 हजार 539 कोटी मंजूर झाले आहेत. राज्यात 35 प्रकल्पांमध्ये 6 हजार 142 किलोमीटर रेल्वेमार्गावर 91 हजार 137 कोटींची कामे सुरू आहेत. 2014 पासून रेल्वे उड्डाणपूल व अंडरब्रिज उभारण्याची 793 ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील रेल्वेजाळे मजबूत होणार आहे, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली.केंद्र सरकारच्या वोकल फॉर लोकल नितीनुसार स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक स्टेशन एक उत्पादन योजना राबविली जात आहे. त्यात महाराष्ट्रातील 74 रेल्वे स्टेशनमध्ये स्टॉल उभारण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिक कारागीरांना रोजगार उपलब्ध होईल, असे आमदार डावखरे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली आहे. त्यात महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेत रेल्वे स्थानकांचा बृहत आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल. त्याचबरोबर रूफ प्लाझा व सीटी सेंटर निर्मिती, रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी मोकळी जागा, रेल्वे कार्यालयांची योग्य ठिकाणी स्थलांतरित, एक स्थानक एक उत्पादनासाठी किमान दोन स्टॉल्सची, एक्झिक्युटिव्ह लाउंज आणि छोट्या व्यावसायिक बैठकांसाठी पुरेशी जागा, सर्व श्रेणीच्या स्थानकांवर उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म (760-840 मिमी) तयार केले जातील. प्लॅटफॉर्मची लांबी साधारणपणे 600 मीटर, दिव्यांगांसाठी सुविधा आदी पुरविल्या जाणार आहेत.

COMMENTS