Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी फार्मसीच्या 13 विद्यार्थ्यांना टीसीएसमध्ये नोकरी

कोपरगाव तालुका ः प्रत्येक कंपनीची गरज वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हतेच्या पदवीधरांची असते. टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) तशी आयटी कंपनी आहे. परंतु

नगरला होणारे अंत्यविधी स्थानिक स्तरावर करा
पैठण- पंढरपुर पालखी महामार्गाची दुरावस्था… आधिकारी मस्त, ठेकेदार सूस्त, जनता त्रस्त:
काकडे महाविद्यालयात अविष्कार संशोधन स्पर्धेत नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर

कोपरगाव तालुका ः प्रत्येक कंपनीची गरज वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हतेच्या पदवीधरांची असते. टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) तशी आयटी कंपनी आहे. परंतु या कंपनीमध्ये आपल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी कशी मिळेल, याचा अभ्यास करून संजीवनी फार्मसी महाविद्यालच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टीअँडपी) विभागाच्या प्रयत्नाने टीसीएस या कंपनीने संजीवनीच्या 13 विद्यार्थ्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच चांगल्या वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी फार्मसी महाविद्यालच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
                टीसीएस कंपनीमध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांमध्ये संदिप ज्ञानेश्‍वर नागरे, अजय खंडू शेखारे, मंगेश बाबासाहेब तगड, स्मिता महेंद्र ढमाले, राहुल आण्णासाहेब घुले, निकिता सुनिल खैरे, आयमान अहेसन अहमेद शेख, तेजल विनोद रोहमारे, गौरव ज्ञानेश्‍वर पाबळे, नलिनी आप्पासाहेब वाघ, तेजस महेंद्र राऊत, अतिशा  बाबासाहेब औताडे व ज्ञानेश  महेश काशीद यांचा समावेश आहे. संजीवनी फार्मसी महाविद्यालय हे विना अनुदाणित वर्गवारीतील भारतातील 9 वे महाराष्ट्रातील 1 ले ऑटोनॉमस दर्जा प्राप्त महाविद्यालय असल्याने वेगवेगळ्या कंपन्या व आस्थापणा यांना अभिप्रेत असणार्‍या  फार्मसी अभ्यासक्रमाचा अंतर्भाव करण्याची मुभा आहे. याचा परिणाम म्हणुन आधुनिक औषधनिर्माण शास्त्राचे ज्ञान संजीवनी मधिल विध्यार्थ्यांना अवगत असते व त्यामुळे ते वेगवेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी सहज पात्र ठरतात. या व्यतिरिक्त मुलाखंतींची तयारी टी अँड  पी विभागामार्फत करून घेण्यात येते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या सर्व विध्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व विध्यार्थ्यांचा समारंभपुर्वक सत्कार केल्या व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, टीअँडपी विभागाचे डीन प्रा. निलेश पेंडभाजे उपस्थित होते.

टी अँड पी विभाग आम्हाला विविध मुलाखतींसाठी नेहमी प्रवृत्त करतो. याचाच एक भाग म्हणुन टीसीएस कंपनीने देश  पातळीवर घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत आम्हाला उतरविले. त्यात आम्ही उत्तिर्ण झालो. त्यानुसार कंपनीने आम्हाला हिंजेवाडी, पुणे येथे प्रत्यक्ष मुलाखतींसाठी बोलविले व त्यातुन माझी चांगल्या पगारावर फार्माको व्हिजिलन्स व क्लिनिकल डेटा मॅनेजमेट कामासाठी निवड झाली. टीअँडपी विभागाने आमची तयारी करून घेतली, त्यामुळेच मला नोकरीची संधी मिळाल्याने माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले. मला संजीवनीमधून खूप चांगले संस्कार मिळाले, त्यामुळेच मला ‘बेस्ट आऊट गोईंग स्टूडन्ट व फर्स्ट रॅन्क इन अकॅडेमिक्स’ असे पुरस्कारही मिळाले.
स्मिता ढमाले, विद्यार्थीनी

COMMENTS