Homeताज्या बातम्यादेश

मध्यप्रदेशात 13 प्रवाशांचा कोळसा

बसला लागलेल्या आगीत मृत्यू

गुना ः मध्यप्रदेशातील गुना येथे डंपरला धडकल्यानंतर एका प्रवासी बसला आग लागली. यामध्ये 13 जण जिवंत जळाले. त्याचवेळी डंपर चालकाचाही मृत्यू झाला आहे

लोधवडे येथे शाळा पूर्व तयारी पालक सभा उत्साहात
श्रीरामपुरात हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे
ओबीसींचे हक्क मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार – ना.विजय वडेट्टीवार

गुना ः मध्यप्रदेशातील गुना येथे डंपरला धडकल्यानंतर एका प्रवासी बसला आग लागली. यामध्ये 13 जण जिवंत जळाले. त्याचवेळी डंपर चालकाचाही मृत्यू झाला आहे. सुमारे 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. बस गुना येथून आरोनच्या दिशेने जात असताना समोरून येणार्‍या डंपरला धडकली. धडक होताच बसने पलटी होऊन पेट घेतला. दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर बसमधील आगीवर मिळवण्यात यश आले. गुनाचे एसपी विजय कुमार खत्री यांनी सांगितले की, बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते. मृतदेह उचलतानाही अवयव खाली पडत असल्याने अपघाताची भीषणता समजू शकते. एकूण 13 मृतदेह सापडले. बसमधून बाहेर काढण्यात आलेल्या नऊ मृतदेहांपैकी सात मृतदेह एकमेकांना चिकटले होते. कुटुंबियांना ओळख पटणार नाही, अशा प्रकारे मृतदेह जळाले आहेत. दरम्यान, स्टेअरिंग आणि ब्रेक जाम झाल्याने डंपर थेट बसला धडकला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्यांना बाहेर काढले. डऊएठऋ टीमही घटनास्थळी पोहोचली. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही. प्रवासी मोहन सिंग यांनी सांगितले की, मी बेकरीचे सामान घेऊन गुनाहून आरोनला जात होतो. मी बसलो होतो तिथून बस वळली. प्रवासी माझ्यावर पडले. मी बाहेर आलो तोपर्यंत बसने पेट घेतला होता. काही लोक तिथेच अडकून पडले होते. मी ट्रॅक्टरने जात असल्याचे प्रत्यक्षदर्शी मुकेश धाकड यांनी सांगितले. मी माझ्या मित्रासोबत प्रवाशांना वाचवण्यासाठी धावलो. सुमारे 15-17 लोकांना खिडक्यांमधून बाहेर काढण्यात आले.

COMMENTS