Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राशीनमध्ये 710 किलो गोमांससह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जत ः कर्जत पोलीस व एलसीबी पथकाच्या संयुक्त कारवाईमध्ये राशीन येथे एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे 710 किलो गोमांस तसेच गोमांस वाहतूक करणारे

जेलमधून पाच जणांचे पलायन, तिघांना पकडण्यात यश
संजीवनी कोविड सेंटर मुळे तालुक्याला मिळाला दिलासा
संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळी महोत्सवाचे आयोजन

कर्जत ः कर्जत पोलीस व एलसीबी पथकाच्या संयुक्त कारवाईमध्ये राशीन येथे एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे 710 किलो गोमांस तसेच गोमांस वाहतूक करणारे महिंद्रा बोलेरो कंपनीचे दोन पिकअप तसेच कत्तल करण्यासाठी आणलेली 57 जनावरे असा एकूण 13 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. मंगळवारी (दि. 28) सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी, गोहत्या बंदी कायदा लागू असताना राशीन येथे गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विकले जात होते. राशीन येथे जनावरांची कत्तल चालू आहे, आता कत्तलीसाठी आणलेली जनावरे मिळून येतील अशी  गुप्त माहिती मिळताच पोलीस अधिकार्‍यांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना फोनद्वारे माहिती दिली. अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वसंत भाटेवाल, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, विश्‍वास बेरड, विशाल दळवी, संदीप दरंदले, सागर ससाने, बाळासाहेब गुंजाळ, बाळू खेडकर, किशोर शिरसाठ, अरुण मोरे, तसेच नाशिक हेडक्वार्टरचे अक्षय ठाकूर, गोरक्षक ऋषिकेश भागवत, राशीन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे, मनोज मुरकुटे, विशाल क्षीरसागर  यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथक घटनास्थळी गेले असताना तेथील पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करताना दिसला. गोरक्षक व पोलिसांची चाहुल लागताच तेथून तो गल्लीबोळीचा फायदा घेत पळून गेला. त्याची आजुबाजूस विचारपुस केली असता त्याचे नाव शाहबाज आयुब कुरेशी, रा. कुरेशी मोहल्ला, राशीन ता. कर्जत असे असल्याचे समजले. त्याच्या घरासमोरील शेड तसेच आजूबाजूची पाहणी केली असता तेथे कत्तल केलेल्या जनावरांचे मांस व गोवंशीय जातीचे लहान मोठी जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने मोकळ्या जागेत, काटवनात तसेच तिथे उभे असलेल्या दोन पिकअप गाडीत मिळून आले. विचारपूस केली असता तेथील जनावरे ही सोहेल कुरेशी (पूर्ण नाव माहित नाही),  सुलतान कुरेशी (पूर्ण नाव माहित नाही) दोघे रा. कुरेशी मोहल्ला, राशीन यांची असल्याचे समजले. याप्रकरणी तिघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत.

COMMENTS