Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 महानगरपालिका यांत्रिकी विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या वतीने 13 बेवारस वाहने जप्त 

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद महानगरपालिका यांत्रिकी विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या वतीने आज शहरातील नेहरू भवन जामा मस्जिद  परिसरातील आणि

आसमानी  संकटापुढे बळीराजा हतबल 
छत्रपती संभाजीनगर मध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी : उदय सामंत

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद महानगरपालिका यांत्रिकी विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या वतीने आज शहरातील नेहरू भवन जामा मस्जिद  परिसरातील आणि इतर ठिकाणाहून एकूण 13 बेवारस चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. तसेच  विविध भागातून बॅनर पोस्टर ,लोखंडी टपरी आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. शहरात होणाऱ्या  जी 20  परिषदे निमित्त मा. प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी  यांच्या आदेशानुसार आज शहरातील विविध भागातून रस्त्यावरच्या टपऱ्या काढण्यात आल्या. यात प्रमुख्याने झोन क्रमांक एक ते नऊ या परिसरात रस्त्यावर बेवारस वाहने बंद पडलेले आणि भंगार अवस्थेतील चार चाकी वाले एकूण 13 जप्त करण्यात आले. अदालत रोड समोरील दहा बाय 11 ची रसवंती आणि दोन टपऱ्या काढण्यात आल्या. मिल कॉर्नर येथील एक लहान टपरी तर सिडको  बस स्टॅन्ड परिसरात दैनिक सकाळ पेपर आणि नैवेद्य हॉटेल  रस्त्यावरील सहा लोखंडी टपऱ्या आणि एक हातगाडी या ठिकाणाहून जप्त करण्यात आली.  याशिवाय अनधिकृत 69  झेंडे, बॅनर, पोस्टर  जप्त करण्यात आले. सदर मोहीम अशीच सुरू राहणार असून अतिक्रमणधारकांनी आपली वाहने ,तसेच  रस्त्यावर असलेले अतिक्रमणे काढून घ्यावे असे आवाहन केले.

COMMENTS