Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या लागणार

पुणे ः सीबीएसईच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार, याची उत्सुकता विद्यार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वाभिमान दिन साजरा
Ahmednagar : आ.संग्राम जगताप यांची आयटी पार्कला भेट
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरू होण्याआधी फिंचने घेतली निवृत्ती

पुणे ः सीबीएसईच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार, याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती. मात्र बारावीचा निकाल आज मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आल्या होत्या. हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 5 जूनपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुभा असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात 12 वीच्या परीक्षांचे आयोजन केले होते. राज्यभरातील बारावीच्या 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.

‘सीबीएसई’ बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर राज्य मंडळाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी सोमनवारी एका परिपत्रकाराद्वारे हा निकाल मंगळवार दिनांक 21 दुपारी 1 वा. ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी 1 वाजेनंतर वरील संकेतस्थळावर जावे. त्यानंतर आपला रोल नंबर व इतर माहिती त्यात टाकून एंटर बटन दाबावे. त्यानंतर 12 वीची मार्कशिट तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ही मार्कशिट पुढील संदर्भासाठी डाऊनलोडही करून ठेवता येईल. छत्रपती संभाजीनगर विभागातून या परीक्षेसाठी 449 केंद्रावर 1,79, 014 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकालानंतर 22 मे ते 5 जून पर्यंत गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

दहावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार – बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार असल्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे. मात्र दहावीचा निकालही पुढील आठवड्यात लागण्याचा अंदाज आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील एकूण 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 59 हजार 478 विद्यार्थी, तर 7 लाख 49 हजार 911 विद्यार्थीनी आणि 56 तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गतवर्षी 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती.

या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार – mahahsscboard.in
mahresult.nic.in
results.gov.in
hscresult.mkcl.org
result.digilocker.gov.in

COMMENTS