Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर येथील 126 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात

बेलापूर प्रतिनिधी ः येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या सुमारे 126 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे आवश्यक पाईप्स व साहित्य आणण्यास स

बौद्ध संस्कार संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
मनपा व जिल्हा परिषद कर्मचारी निवडणुकीत रंगणार
शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू ः आ. रोहित पवार

बेलापूर प्रतिनिधी ः येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या सुमारे 126 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे आवश्यक पाईप्स व साहित्य आणण्यास सुरुवात झाली आहे.सदरचे सर्व साहित्य पोहोचताच योजनेच्या कामाचा शुभारंभ होईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की केंद्र व राज्य शासनाने जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत 126 कोटी खर्चाच्या नूतन पाणीपुरवठा योजनेस मान्यता दिली. या कामी महाराष्ट्र शासन तसेच राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे. सदर योजनेनुसार प्रतिदिन दरडोई 55 लिटर प्रमाणे शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. योजनेत साठवन तलाव जलशुद्धीकरण केंद्र मुख्य वितरण टाकीसह वाड्यावस्त्या वर स्वतंत्र वितरण टाकी यांचा समावेश आहे. यामुळे गावासह सर्व वाड्यावस्त्यावरील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. जुन्या पाईपलाईन काढून नवीन सुमारे 140 किलोमीटर एकूण लांबीच्या पाईपलाईन्स टाकल्या जाणार आहेत. सदरच्या योजनेमुळे गावाला पुढील शंभर वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे .या योजनेसाठीचे साहित्य येण्यास सुरुवात झाली असल्याने, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS