Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेच्या घरी आढळले 12 हजार लिटर पेट्रोल; 77 रुपये प्रतिलिटर दराने विक्री

नागपूर : नागपुरातील एका महिलेच्या घरी तब्बल 12 हजार लीटर पेट्रोलचा साठा आढळून आला. शहरातील खापरी भागात पोलिसांनी छापा मारल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली

विट्यात दोन चिमुरड्यांसह महिलेची आत्महत्या
रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी
सोनं महागले; पाच महिन्यातील उच्चांकी पातळीवर

नागपूर : नागपुरातील एका महिलेच्या घरी तब्बल 12 हजार लीटर पेट्रोलचा साठा आढळून आला. शहरातील खापरी भागात पोलिसांनी छापा मारल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली. पोलिसांनी पेट्रोलचा साठा जप्त केला आहे. तसेच महिलासह तिघांना अटक केली आहे. पेट्रोलियम कंपनीच्या डेपोपासून पेट्रोल पंपापर्यंतच्या वाहतुकीत टँकरवर बसवण्यात आलेली दुहेरी सुरक्षाव्यवस्था निकामी करून पेट्रोल चोरी करणार्‍या रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भंडाफोड केलाय. ही टोळी दररोज पेट्रोलची चोरी करत होती. यासंदर्भातील माहितीनुसार देशात पेट्रोल, डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली असताना नागपुरातील खापरी परिसरात 77 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची विक्री होत होती. हे सर्व पेट्रोल चोरीचे असायचे. विदर्भात पेट्रोलियम कंपन्यांच्या डेपो मधून निघणारे टँकर्स निर्जन ठिकाणी थांबवून त्याच्यातून हे पेट्रोल चोरी केले जायचे. यामध्ये एका सराईत टोळीसह टँकर्सचे चालक ही सहभागी असायचे. पेट्रोल चोरी करणार्‍या रॅकेट बद्दल गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांनी रविवारी पहाटे खापरी परिसरात हायवे लगत असलेल्या एका झोपडीवर धाड टाकली. तेव्हा हा सर्व गोरखधंदा उघडकीस आला. पोलिसांनी खापरीमध्ये निर्जन ठिकाणी असलेल्या मीना द्विवेदी नावाच्या महिलेच्या झोपडीतून पेट्रोल भरलेले अनेक कॅनसह तब्बल 12 हजार लीटर पेट्रोल जप्त केले आहे.

COMMENTS