Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजारामबापू कारखान्याच्या कर्मचार्‍यांना 12 टक्के पगारवाढ : पी आर पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपल्या चारही युनिटक

वरुणराजाच्या रौद्र अवतार: 40 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार
नगरला धोका ठरणारा पाझर तलाव होणार दुरुस्त ; हिवरे बाजारच्या प्रस्तावास मान्यता
कारखाने विक्री घोटाळ्याची ईडी-सीबीआय चौकशी करा ; शेतकरी कामगार महासंघाची सहकार परिषदेत मागणी

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपल्या चारही युनिटकडील पात्र कायम व हंगामी कर्मचार्‍यांना त्रिपक्षीय समितीने सुचविलेली 12 टक्के पगारवाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून 12 टक्के पगार वाढ जाहीर करण्यात आली आहे. कामगार नेते शंकरराव भोसले यांनी ना. जयंत पाटील, अध्यक्ष पी. आर. पाटील व व्यवस्थापनाचे जाहीर आभार मानले.
राज्य शासन, साखर कारखाने व कामगार संघटनेच्या प्रतिनिधींच्या त्रिपक्षीय समितीने 4 ऑक्टोंबर 2021 रोजी राज्यातील साखर कामगारांना 1 एप्रिल 2019 पासून 12 टक्के पगार वाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने साखराळे युनिट, वाटेगाव-सुरुल शाखा, कारंदवाडी युनिट व तिप्पेहळ्ळी (जत) युनिटमधील अधिकारी, पात्र कायम, हंगामी कायम व हंगामी कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2022 पासून ही पगार वाढ लागू केली आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी साखराळेच्या माळावर आपला साखर कारखाना उभा केला. स्व. बापूंनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देताना साखर कारखान्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कुटुंबातील घटकाप्रमाणे वागणूक दिली. कामगारांनी हा माझा साखर कारखाना आहे, असे समजून कारखान्याचे सातत्याने हित जपले आहे. तीच परंपरा व वारसा ना. जयंत पाटील जपत आहेत. राजारामबापू सहकारी साखर कारखान्यात कामगार संघटना व कारखाना व्यवस्थापनाचे नाते कायम सलोख्याचे राहिले आहे. या पगार वाढीने अधिकारी, कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना कमीत-कमी 2 हजार पाचशे ते 4 हजार पाचशे इतकी वाढ होत असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, माल खरेदी समितीचे अध्यक्ष विराज शिंदे, बांधकाम समितीचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, कामगार नेते शंकरराव भोसले, कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील, मुख्य वेळापाल संजय गुरव उपस्थित होते.
कारखान्याकडून कामगारांना नव वर्षाची मोलाची भेट
राजारामबापू साखर कारखान्याने 12 टक्के पगार वाढ लागू करून आमच्या साखर कामगारांना नव वर्षाची मोलाची भेट दिली आहे. वंदनीय राजारामबापू पाटील यांनी कामगार हा आपल्या परिवाराचा घटक मानला आणि तीच परंपरा ना. जयंत पाटील यांनी पुढे चालू ठेवल्याचा सार्थ अभिमान आम्हास आहे. 12 टक्के पगार वाढ लागू केल्याबद्दल ना. जयंतराव पाटील, पी. आर. पाटील व व्यवस्थापनाचे आपण जाहीर आभार मानतो, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस, कामगार नेते शंकरराव भोसले यांनी दिली.

COMMENTS