तासगाव / प्रतिनिधी : तासगाव व नागेवाडी कारखान्याचे थकित ऊस बिलासाठी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला उर्वारित 12 कोटीचे धनादेश शेतकर्यांना देण्
तासगाव / प्रतिनिधी : तासगाव व नागेवाडी कारखान्याचे थकित ऊस बिलासाठी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला उर्वारित 12 कोटीचे धनादेश शेतकर्यांना देण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेशभाऊ खराडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले व मोर्चाला सुरवात झाली. तेथुन मोर्चा गणपती मंदिरात आला व गणपतीला साकडे घातले की, शेतकर्याचे पैसे लवकर शेतकर्यांच्या खात्यावरती जमा करावे. गणपतीने काकांना सबुध्दी देवो. तेथुन मोर्चा तहसिलदार कार्यालयावर आला मोर्चात घोषणा देण्यात आल्या.
संजय काकाचे करायचे काय खाली डोके वर पाय, ऊस बिल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चा तहसिलदार कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पोलीस व शेतकर्यांच्यात धुमश्चक्री झाली.
खराडे म्हणाले, जोपर्यंत शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत तोपर्यत आम्ही उठणार नाही. तसेच यावेळी तहसिदार यांनी मध्यस्थी करून यावेळी 10 जानेवारीचे 12 कोटीचे चेक देण्यात आले. यावेळी दामाजी डुबल, महेश जगताप, अमित रावताळे, सरदार सावंत, संदिप शिरोटे, विशाल पाटील, प्रविण देशमुख, तसेच कवठे एकंद, नागाव बोरगाव, विसापुर, लिंब, नांद्रे, खोतवाडी, विखळे, कानकात्रे, कुमठे, धुळगाव, अंकलखोप, आरवडे, नागेवाडी यांच्यासह अन्य भागातुन शेतकरी उपस्थित होतो.
COMMENTS