जामखेड ः कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात खरीप हंगाम 2023 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती व पीक काढणीच्या वेळेस झालेल्या पावसाने शेती प
जामखेड ः कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात खरीप हंगाम 2023 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती व पीक काढणीच्या वेळेस झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पीकविमा मंजूर व्हावा यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. त्याला मोठे यश मिळाले आहे. महायुती सरकारने कर्जत जामखेड मतदारसंघासाठी 12 कोटी 68 लाख रूपयांचा पीकविमा मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये 2023 च्या खरिप हंगामात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. उगवून आलेली पिकं काढणीवेळी झालेल्या पावसामुळे वाया गेली होती. त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. खरिप हंगामातील पिके वाया गेल्यामुळे नुकसान भरपाई पोटी मिळणारा पिक विमा मिळावा यासाठी शेतकर्यांकडून सातत्याने मागणी होत होती. पिक कापणी प्रयोगावरती आधारित पिक विमा मंजूर करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर चालू आहे. लवकरच हाही पीकविमा मंजुर होऊन शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होणार आहे.जामखेड तालुक्यात मूग उडीद व सोयाबीन आणि कर्जत तालुक्यात मक्का उडीद या पिकांसाठी शेतकर्यांना विमा मिळण्याची शक्यता आहे. सर्व शेतकरी बांधवांनी 15 जुलैच्या आत पीकविमा भरून घेण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.
खरिप हंगाम 2023 मध्ये पावसाने ओढ दिल्याने त्याचबरोबर पीक काढणीवेळी पाऊस आल्याने खरिप हंगाम वाया गेला होता. कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी बांधवांना पीकविमा मिळावा यासाठी महायुती सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जामखेड तालुक्यासाठी 7 कोटी 8 लाख 36 हजार 446 रूपयांचा तर कर्जत तालुक्यासाठी 5 कोटी 60 लाख 24 हजार 793 रूपयांचा असा एकुण 12 कोटी 68 लाखांचा पीक विमा मंजुर केला आहे. अजूनही ऊर्वरित शेतकर्यांचा पीकविमा मंजुर होणार आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील संकटात सापडलेल्या शेतकर्यांना पीकविमा मंजुर केल्याबद्दल महायुती सरकारचे मनापासून आभार !
आमदार प्रा. राम शिंदे
COMMENTS