Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातील ११७ डॉक्टर संपावर 

ठाणे प्रतिनिधी - गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या विविध मागण्या मार्गी लागण्यासाठी राज्यातील निवासी वैद्यकीय संघटनेने (मार्ड) च्या डॉक्टरांनी नव

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा जेरबंद
उमरखेड येथे शेतकऱ्याकडे धाडसी चोरी
भाऊसाहेब उमाटे यांनी उलघडला मुक्तिसंग्रामाचा इतिहास

ठाणे प्रतिनिधी – गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या विविध मागण्या मार्गी लागण्यासाठी राज्यातील निवासी वैद्यकीय संघटनेने (मार्ड) च्या डॉक्टरांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून संपाचा इशारा दिली आहे. त्यानुसार कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह इतर आरोग्य विभागातील जवळपास ११७ निवासी डॉक्टरानी संप आजपासून पुकारला त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी अर्थात एमडी किंवा एमएसचे शिक्षण घेणारे विद्यार्थी डॉक्टर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सेवेत मदत करत आहेत. त्यांना राज्यभरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दरमहा किमान ७५ हजार रुपयांचे मानधन देण्यात येते. बहुतांशी रुग्णांवर उपचार सेवा देण्याचे काम हेच विद्यार्थी वैद्यकीय प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करीत असतात. अशा प्रकारची सेवा मुंबई महापालिकेत देण्यात येते, तेथील डॉक्टरांना ठाणे महापालिकेच्या तुलनेत जास्त आहे. दरम्यान राज्यभरातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सेवेचा ताण सोसून काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनाही मानधनात वाढ करावी. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह पालिकेच्या आरोग्य केंद्रातील जवळपास ११७ निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. तेही याच मागणीसाठी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. हा संप राज्यव्यापी असल्याने त्यात येथील डॉक्टर्स ही सहभागी होणार आहेत. त्यामुळे ठाणे पालिकेच्या   ६० टक्के वैद्यकीय उपचार सेवेत खोळंबा होणार आहे.

COMMENTS