Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

तब्बल 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे ः राज्यात आज शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. यंदा तब्बल 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा देणार आहेत. 5 हजार 86 केंद्रावर प

समृद्धीवर अपघात कमी करण्यासाठी सुविधा वाढवणार
कामावरुन काढल्याच्या रागातून मालकिणीला जिवंत जाळलं अन् स्वतःही जळाला
नगरचे रस्ते विकासाला डांबर दरवाढीची खीळ

पुणे ः राज्यात आज शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. यंदा तब्बल 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा देणार आहेत. 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. आज शुक्रवारी दहावीचा पहिला पेपर आहे. दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वपूर्ण वळण असते. दहावीनंतर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या व भावी जीवनाच्या दिशा स्पष्ट व्हायला लागतात. परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणार्‍या चुकीच्या संदेशांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा विचार करु नका. कारण गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कुणी गैरप्रकार करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

COMMENTS