नाशिक- दि.२३. ०६.२०२४ रोजी प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट वाशी नवी मुंबई तर्फे पेठ तालुक्यातील १०२ जि. प. प्रा.शाळेतील विध्यार्थीना शैक्षणिक साहि

नाशिक– दि.२३. ०६.२०२४ रोजी प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट वाशी नवी मुंबई तर्फे पेठ तालुक्यातील १०२ जि. प. प्रा.शाळेतील विध्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले प्रयास फाऊंडेशन मुंबई कडून सन २०२२ पासून सुरगाणा तालुक्यातील सर्व जि. प.शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. मागील वर्षी पासून पेठ मधील शाळाना वाटप केले पेठ मधील जि. प. शाळाना वाटप करण्याची पालकांची, शिक्षक यांनी मागणी केल्याने सन 2024 ला 102 शाळाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट वाशी नवी मुंबई तर्फे आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा व मायेची उब पोहचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आदिवासी भागातील पालक यांची आर्थिक परिस्थिती व रोजगारासाठी स्थलांतर करुन मोलमजुरी करतात त्याचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून दरवर्षी प्रयास फाऊंडेशन प्रयास करुन आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य द्यावे हा प्रयास चा उद्देश आहे. कठीण परिस्थितीतुन आदिवासी समाजातील शेतकरी,मंजूर पालक वर्ग मुलांना शिक्षण देत आहे. यामुळे स्पर्धेत टीकावीत पालकांनचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न प्रयास फाऊंडेशन मुंबई यांचा प्रमुख उद्देश आहे. प्राथमिक शाळेतील विध्यार्थी यांना शाळा सुरु झाल्यावर शैक्षणिक साहित्य दिल्यानंतर उत्सहात शिक्षणात आवडत निर्माण होते. शालेय स्टेशनरी पाट्या,पेन्सिल पुडे,एक रेघी वह्या,दोन रेघी वह्या,चार रेघी वह्या,चौकट रेघी वह्या,पेन्सिल,खोडरबर,शॉपनर,पेन,फुलस्केप वह्या,इत्यादी साहित्य १०२ जि.प.शाळांना वाटप करण्यात . प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट नवी मुंबई तर्फे राजेंद्रकुमारजी सुराणा,रवींद्रजी पाटील,किशोरभाई जैन, संजयजी अग्रवाल,राजीवजी पाटील समन्वयक संजय कुमार,नवल अहिरे, दुर्वादास गायकवाड यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सर्व जि. प. शाळेतील शिक्षकाचे सहकार्य मिळाले.
यावर्षी पेठ तालुक्यातील १०२ जि. प. शाळांना पालकांच्या, शिक्षक यांच्या मागणी वरून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले पालकांचा आर्थिक भार कमी व्हावा व ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होऊन दैनंदिन शाळेत जाऊन ग्रामीण शैक्षणिक पाया भक्कम व्हावा हा प्रयास कडून प्रयत्न करण्यात आला हेच प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट वाशी नवी मुंबई ग्रामीण भागातील विध्यार्थी यांना शिक्षण प्रवाहात आणन्याचे कामावर भर देत आहे. राजेंद्र कुमार सुराणा अध्यक्ष प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट नवी मुंबई
आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक विकास विकाच्या दृष्टीने अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु असून पेठ सुरगाणा त्रंबकेश्वर तालुक्यातील विध्यार्थी घडविण्याचे शैक्षणिक धोरण सुरु असून अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेण्यात येत असून हाच प्रयत्न तीन वर्षांपासून प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट नवी मुंबई यांच्या माध्यमातून सुरगाणा, पेठ तालुक्यातील सर्व जि. प. शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. दर्वादास गायकवाड जलपरिषद मित्र परिवार
COMMENTS