Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हेजच्या टेबलावर नॉन व्हेजचे जेवण केल्याने 10 हजारांचा दंड

आयआयटी मुंबईच्या भोजनालय समितीची विद्यार्थ्यांवर कारवाई

मुंबई/प्रतिनिधी ः आपल्या उच्च आणि दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली आयआयटी मुंबई वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे व्

गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये रंगला गोळीबाराचा फिल्मी स्टाइल थरार… (Video)
नरेश राऊत फाउंडेशनकडून पाडाळणे शाळेस अ‍ॅक्टिह बोर्ड भेट
रिक्षात बसलेल्या प्रवाशी महिलेची पर्स पळवली

मुंबई/प्रतिनिधी ः आपल्या उच्च आणि दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली आयआयटी मुंबई वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे व्हेजच्या टेबलावर बसून नॉनव्हेज सेवन केल्याप्रकरणी आयआयटी मुंबईच्या काही विद्यार्थ्यांना तब्बल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडात्मक कारवाईमुळे देशातील ही शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आयआयटी मुंबई ही देशातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. पण या संस्थेत आता शाकाहारीविरुद्ध मांसाहारीचा वाद रंगला आहे. संस्थेच्या 12, 13 व 14 क्रमांकाच्या वसतिगृहातील भोजनालय समितीने बेशिस्त वर्तन व भोजनालयाचे नियम मोडणार्‍या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, शाकाहारींसाठी राखीव असणार्‍या जागेवर गुरुवारी काही विद्यार्थ्यांनी मांसाहार केला. भोजनालयात शाकाहारी व मांसाहारी अशी विभागणी करण्यात आल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी ही कृती केली. व्हेजच्या टेबलावर नॉनव्हेज सेवन केल्याप्रकरणी भोजनालय समितीने 12 नंबरच्या हॉस्टेलमधील एका विद्यार्थ्याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ओळख पटल्यानंतर आणखी दोघांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. भोजनालय समितीने मंजूर केलेल्या कार्यवृत्तात हा उल्लेख आहे. भोजनालय समितीच्या बैठकीत 4 प्राध्यापकांसह वॉर्डन व 3 विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत विद्यार्थ्यांचे गैरवर्तन व भोजनालय नियमांचे उल्लंघन यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार, 28 सप्टेंबर रोजी रात्रीच्या भोजनावेळी काही विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन केले. याचे पुरावे आहेत, असे समितीने म्हटले आहे. समितीने या प्रकरणी अन्य 2 विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी 3 वसतिगृहाच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मदत मागितली आहे. समितीने विद्यार्थ्यांना भोजनालयात शांतता टिकवण्यासाठी सहकार्यही मागितले आहे. आयआयटी मुंबईत 3 हॉस्टेलचे मिळून एक कॉमन भोजनालय आहे. त्यातील 6 टेबल्स शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याच्या भोजनालय समितीच्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. मागच्या आठवड्यात विद्यार्थ्यांना तशी कल्पना देण्यात आली होती. त्यावेळी कॅम्पसमध्ये भेदभाव वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता.

COMMENTS