Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजूर प्रकल्पातील 22 आश्रम शाळांचा शंभर टक्के निकाल

अकोले ः एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अंतर्गत चालवण्यात येणार्‍या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शासकीय 15 तर

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी  कॉलेज ची   विज्ञान शाखेची  100% निकालाची परंपरा कायम
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल

अकोले ः एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अंतर्गत चालवण्यात येणार्‍या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शासकीय 15 तर सात अनुदानित आश्रम शाळा असे एकूण 22 आश्रम शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी श्री राजन पाटील यांनी दिली.
 माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांनी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेत नगर जिल्ह्यातील राजूर प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रम शाळांची 657 पैकी 644 तर अनुदानित आश्रम शाळेतील 398 पैकी 367 अशी एकूण 1055 पैकी 1011 विद्यार्थी उत्तीर्ण झाले  असून, राजूर प्रकल्पाचा निकाल 96 टक्के इतका लागला आहे. राजूर प्रकल्पांतर्गत असणार्‍या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील प्रकल्पातील प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम भांगरे गोरक्ष देवराम 93.20 टक्के द्वितीय लोहकरे चारुशीला अशोक 92.5 टक्के तृतीय हर्षदा चंद्रकांत चौधरी 91.00 टक्के याप्रमाणे गुण संपादन करुन प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थी व सर्व आश्रम शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांचे प्रकल्प अधिकारी राजन पाटील, सहा.प्रकल्प अधिकारी (प्रशा) मनोज पैठणकर, दिपक कालेकर (शिक्षण), नानासाहेब झरेकर (शिक्षण), कार्यालयीन अधीक्षक सुनिल मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी आंबादास बागुल, प्रशांत हासे यांनी अभिनंदन केले आहे.

शैक्षणिक वर्ष -2023- 24 मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी राजूर प्रकल्पातील तज्ञ शिक्षकांच्या मदतीने सातत्याने क्षमता चाचणी, विकेंड टेस्ट, सराव परीक्षा यासारख्या  शैक्षणिक उपक्रमांमुळे तसेच शाळा- शाळा वर राबवले जाणारे जादा तासिका व विविध शैक्षणिक उपक्रम तसेच प्रकल्प कार्यालयाकडून प्रभावी पर्वेक्षण यामुळे आश्रम शाळा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावली आहे. येणार्‍या शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये गुरुशाला उपक्रमा अंतर्गत शिक्षक, अधीक्षक व विद्यार्थी यांना पुढील तीन वर्षे शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत.
राजन पाटील, प्रकल्प अधिकारी

COMMENTS