Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल

लोणी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा महमंडळाने घेतलेल्या दहावीच्या शालांत परीक्षेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटी

राजूर प्रकल्पातील 22 आश्रम शाळांचा शंभर टक्के निकाल
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी  कॉलेज ची   विज्ञान शाखेची  100% निकालाची परंपरा कायम

लोणी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा महमंडळाने घेतलेल्या दहावीच्या शालांत परीक्षेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थाच्या 14 शाळा या शंभर नंबरी ठरल्या असून, संस्थेच्या 1 हजार 993 विद्यार्थ्यापैकी 1 हजार 918 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. निकालात  मुलींनी बाजी मारली आहे.
संस्था पातळीवर प्रवरा कन्या विद्या मंदीरच्या  मुलींनी अव्वल स्थान पटकावले आहे. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 1,993 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली यामध्ये 1,918 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 41 शाळांपैकी  शंभर टक्के निकाल असलेल्या शाळा – 14 तर 22  शाळाचा निकाल हा 96 ते 90 टक्के लागला आहे.उच्च श्रेणी मध्ये 702 प्रथम श्रेणी 701 तर तृतीय श्रेणीत 395 विद्यार्थी यशस्वी ठरले.  शंभर टक्के शाळा मध्ये प्रवरा कन्या विद्या मंदीर, प्रवरा गर्ल्स इंग्लिश स्कुल, पदमश्री विखे पाटील सैनिकी स्कुल, लोणी, प्रवरा पब्लीक स्कुल, प्रवरानगर, भुतेटाकळी, उंबरी, वरवंडी, सावरगांवतळ, शिबळापूर, ममदापूर, नांदूर, कासारवाडी, चोळकेवाडी, सोनेवाडी, या शाळांचा समावेश आहे. संस्थेच्या नव्वद  विद्यार्थ्यानी या परिक्षेत नव्वद टक्के गुण मिळविले. संस्था पातळीवर प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी येथील कु.अक्षरा नामदेव आघाडे 98.80 गुण मिळून प्रथम, कु.समृध्दी अनिल जंगले 98 टक्के द्वितीय तर याच  शाळेची कु. सृष्टी अनिल निर्मळ 96.80 टक्के गुण मिळवत तृतीय आली आहे. याच शाळेतील तीन मुलींनी संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळविले. या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री  ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, डॉ. राजेंद्र विखे पाटील खा. डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लिलावती सरोदे, शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS