मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेत 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा झाल्याचा आरोप पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाक

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेत 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा झाल्याचा आरोप पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्याशी संबंधित एका कंपनीला कोविड हॉस्पिटल उभारण्याच्या नावाखाली 100 कोटींचे कंत्राट बेकायदा देण्यात आले असून, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार करण्यात आला, असा आरोप सोमय्या यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याशी संबंधित ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रायवेट लिमिटेड कंपनीला मुंबई महानगरपालिकेने मुलुंड रिचार्डसन क्रूडास मैदानावरील तात्पुरते कोविड हॉस्पिटलच्या नावाने 100 कोटींचे गिफ्ट दिले. 1850 खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचे या ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. 2019 पर्यंत काही संगीताचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. त्याच कंपनीला मुलुंड व दहिसर येथील कोविड हॉस्पिटल बांधणे आणि भाड्याने देण्याचा अट्टाहास मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या संगनमताने करण्यात आला. किरीट सोमय्या म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारनी रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. तेथे सिडको यांना तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश देण्यात आले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 1850 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याची ऑर्डर दिली. त्यासाठी रु. 10 कोटी 94 लाखांचे पेमेंटही करण्यात आले. 7 जुलै 2020 ते 31 जुलै 2022 पर्यंत म्हणजे 25 महिने हे हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले त्यासाठी ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला दर महिने 3 कोटी 59 लाख 78 हजार रुपये भाडे देण्यात आले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
COMMENTS