Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नाटकात ट्रक उलटून 10 जणांचा मृत्यू

बेळगाव : कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गोळापूर घाटात भाजीपाल्याचा व

तुकडे बंदीचा फटका सर्वसामान्यांना; शासनाने फेरविचार करण्याची गरज
मलायकाने शेअर केला अर्जुनचा न्यूड फोटो
मालेगावमध्ये महापालिकेत काँगे्रसला खिंडार ; काँगे्रसच्या महापौरांसह 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश

बेळगाव : कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गोळापूर घाटात भाजीपाल्याचा वाहतूक करणारा ट्रक बुधवारी पहाटे पलटी झाल्याने हा अपघात घडला असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसर्‍या दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांसमवेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचीही दुर्घटना घडली.
कर्नाटकच्या रायपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सिंधनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहन पलटी होऊन ही अपघाताची घटना घडली आहे. नरहरी मंदिरात पूजा करण्यासाठी विद्यार्थ्यांची कार हम्पीच्या तीर्थयात्रेसाठी निघालेली होती. मात्र, भीषण दुर्घटनेत कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, बुधवारी पहाटे यल्लापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडली आहे. या अपघातात मृत पावलेले सर्वजण सावनुर येथील रहिवासी आहेत. ट्रकमधील सर्वजण सावनुरमधून कमेठी येथील भाजी मंडईत जात होते. या ट्रकमधून 25 जण प्रवास करत होते.रस्त्यावर धुके असल्याने या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले असून जखमींना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनास्थळी यल्लापुर पोलीस स्थानकाचे अधिकारी तपासासाठी पोहोचले असून क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले जात आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख नारण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अपघाताबद्दल माहिती संकलित केली. पोलिसांकडून अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान पहाटेच्या सुमारास भाजीपाला घेऊन जाणार्‍या ट्रकसोबत घट्टा परिसरात पहाटे धुक्याचे वातावरण असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. धुक्याच्या वातावरणामुळे पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने लॉरी पुढच्या वाहनाला धडकली आणि चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर, बाजुच्या खड्ड्यात ट्रक पडली असल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातातील जखमींना हुबळी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यल्लापूर पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

COMMENTS