Homeताज्या बातम्यादेश

देशातील 1 कोटी महिला बनल्या ‘लखपती दीदी’

नवी दिल्ली ः देशात 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या, असून आता 3 कोटींचे लक्ष्य असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरो

‘डंकी’ सिनेमाआधी शाहरुख खान वैष्णो देवी चरणी
साहित्याचे नोबेल : अध्यात्म आणि भूक! 
प्रतिपिंडाचा प्रभाव कमी झाल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ

नवी दिल्ली ः देशात 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या, असून आता 3 कोटींचे लक्ष्य असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद वाढवली. लखपती दीदींना आणखी प्रोत्साहन दिले जाणार आहे. देशभरात लखपती दीदी योजनेचे लक्ष्य दोन कोटी असताना 1 कोटी महिलांना याचा लाभ मिळाला आहे.
आता याचे लक्ष्य दोन कोटीवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे 9 कोटी महिलांचे आयुष्य बदलले आहे. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे.  यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सरकारने मागील 10 वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट, 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. देशातील दोन कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले होते. आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे लक्ष्य वाढवत 3 कोटी केले आहे.

चौकट—————-
लखपती दीदी योजनेचा उद्देश ?
लखपती दीदी योजनेचा उद्देश गरिबी निर्मूलन आणि आर्थिक सशक्तीकरण आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान केलं जाईल. जेणेकरुन त्या प्रतिवर्ष 1 लाख रुपयांपेक्षा अधिक कमावू शकतील. ही योजना महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात राबवण्यात येणार आहे. लखपती दीदी बनवण्यासाठी महिलांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन उपलब्ध करुन देऊन त्यांना ड्रोनचे संचालन आणि दुरुस्ती करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

COMMENTS