केज : शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात 1 कोटी रुपये खर्चून ‘नमो उद्यान’ उभारण्यात येणार आहे. श्री दत्त जिल्हा परिषद कर्मचारी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोस

केज : शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात 1 कोटी रुपये खर्चून ‘नमो उद्यान’ उभारण्यात येणार आहे. श्री दत्त जिल्हा परिषद कर्मचारी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या सर्वे नं. 18/3 मधील सुमारे 23 गुंठे मोकळ्या जागेत हा प्रकल्प साकारला जाणार आहे.
या कामासोबत अंतर्गत रस्ते व विद्युत रोषणाईची सुविधा देखील करण्यात येणार असून, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी 15 कंत्राटदारांनी टेंडर भरले होते. पारदर्शक प्रक्रियेनंतर काम अंतिम करण्यात आले आहे. उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी बसण्याची सोय आणि महिलांसाठी फिरण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होणार आहे. प्रा. ईश्वर मुंडे यांच्या पुढाकारातून व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. दरम्यान, कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन सभासद प्रकाश मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS