Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर परिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी 1 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर 

डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाला यश

देऊळगाव राजा प्रतिनिधी -  नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्र. १ देऊळगावराजा  येथील शाळेची स्थापना सन १९३४ रोजी झालेली असुन इमारतीचे बांधकाम सन १९५

ओबीसी शिष्टमंडळाची 29 सप्टेंबरला राज्य सरकारसोबत बैठक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
अहमदनगर बारच्या अध्यक्षपदासाठी; तिरंगी तर उपाध्यक्षपदासाठी दुरंगी लढत

देऊळगाव राजा प्रतिनिधी –  नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्र. १ देऊळगावराजा  येथील शाळेची स्थापना सन १९३४ रोजी झालेली असुन इमारतीचे बांधकाम सन १९५० चे आहे. शाळा इमारत हो शिकस्त झालेली असून आज रोजी शाळेमध्ये इयत्ता १ ली ते ४ थी चे ३६० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर शाळा ही वापरास धोकादायक झालेली असून उपायोजना म्हणून इमारतीचा वापर पूर्णपणे बंद करण्यात यावा असे प्रमाणपत्र दिलेले आहे. शाळा शिकस्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

शाळेला पटसंख्येनुसार आवश्यक असलेल्या १४ नवीन वर्गखोल्या, १ मुख्याध्यापक कक्ष, २ मुलांसाठी स्वच्छतागृह, २ मुलीसाठी स्वच्छतागृह व शिक्षक स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी समग्र शिक्षा अंतर्गत नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्र. १ देऊळगांवराजा जि बुलडाणा च्या मा. राज्यप्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना सादर केलेल्या प्रस्तावास त्वरीत मान्यता मिळावी अशी मागणी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती.अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून शाळेच्या नवीन इमारतीसाठी 1 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे या ठिकाणी आता शाळेचे नवीन बांधकाम होणार आहे त्यामुळे शहराच्या विकासात आणखी भर पडणार आहे. या अगोदर खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून 50 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे आता एकूण निधी 1 कोटी 85 लक्ष रुपयातून नगर परिषद शाळेची टुमदार इमारत साकारणार आहे.

COMMENTS