श्रीगोंदा शहर:- जून महिन्यात शेतीची कामे आणि मुलांचे शाळा प्रवेश यासाठी प्रत्येकाला आर्थिक अडचण असते अशावेळी दरवर्षी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट
श्रीगोंदा शहर:– जून महिन्यात शेतीची कामे आणि मुलांचे शाळा प्रवेश यासाठी प्रत्येकाला आर्थिक अडचण असते अशावेळी दरवर्षी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी वर्धापन दिनाच्या निमित्ताने बचत गट कर्ज वाटप करण्यात येते यावर्षी देखील वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील सुमारे 50 महीला बचत गटांना सुमारे 1 कोटी 27 लाख रुपयांचे कर्ज गट विकास अधिकारी राणी फराटे,मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, प्रा. सर्जेराव हळनोर आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी नियमित 4वेळा कर्ज परत फेड करणार्या तालुक्यातील वांगदरी येथील गुरुकृपा महीला बचत गटातील 4 महिलांना प्रत्येकी 1 लाख रुपये तर श्रीगोंदा फॅक्टरी येथील नंदिनी महीला बचत गट ,बेलवंडी कोठार येथील तुकाई महीला बचत गट,अमृता बचत गटातील महिलांना प्रत्येकी 1लाख रुपये कर्ज देण्यात आले. यावेळी नीट परीक्षेत प्रावीण्य मिळविणार्या आदिती गवते आणि इतर विद्यार्थ्यांचा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून सेवा निवृत्त झालेल्या माजी गट विकास अधिकारी रामचंद्र म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. सर्जेराव हळनोर यांनी यावेळी बोलताना वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या माध्यमातून विठ्ठलराव वाडगे यांनी चैतन्य महीला बचत गटांची सहकारी पतसंस्था द्वारे जून महिन्यात शेतीची कामे आणि मुलांचे शाळा प्रवेश तसेच दिवाळी साठी आर्थिक अडचण असते हे पाहून प्राधान्याने कर्ज वाटप करतात तसेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करतात. आश्रम शाळा असो की गो सेवा, कोरोना काळात जेवणाचे डबे यातून आपली सामाजिक बांधिलकी दाखवली असे गौरवोद्गार काढले. प्रास्तविकात प्रदीप आठरे यांनी सोसायटीच्या 225 कोटी ठेवी असून सोने तारण मध्ये गत महिन्यात विक्रमी कर्ज वाटप केल्याचे तसेच महीला बचत गटांना कर्ज वाटप केल्याचे सांगितले. सेवा निवृत्त रामचंद्र म्हस्के यांनी सोसायटी नाव लौकीक वाढविण्यात मोलाची मदत केली अशा शब्दात म्हस्के यांचा गौरव करून त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी विठ्ठलराव वाडगे, चैतन्य महीला बचत गटांची सहकारी पतसंस्था चेअरमन रुक्मिणी ताई वाडगे, सायली वाडगे, मेघना गावडे, ज्ञानदेव गवते, विठ्ठलराव दरेकर, आघाव भाऊसाहेब आदी उपस्थित होते.
COMMENTS