लातूर प्रतिनिधी - नागरी दलितेत्तर योजने अंतर्गत शहरात 1 कोटी 25 लाख रुपयाच्या विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रवि
लातूर प्रतिनिधी – नागरी दलितेत्तर योजने अंतर्गत शहरात 1 कोटी 25 लाख रुपयाच्या विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रविवारी दि.20 रोजी करण्यात आले आहे. यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, शिवानंद हेंगणे, माधवराव जाधव, निवृत्तीराव कांबळे, अजहर बागवान, अश्विनी कासनाळे, मीनाक्षी शिंगडे, दयानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मिरकलेनगर (10 लाख), नागोबा नगर 10 लाख), छत्रपती शिवाजी नगर टेंभुर्णी (10 लाख), त्रिवेणी नगर (20 लाख), शिवाजी नगर (10 लाख), जवहार कॉलनी (10 लाख), आयोध्या नगर ( एल.आय.सी.) (10 लाख) येथील सिमेंट काँक्रीट रस्ता, महात्मा बसवेश्वरनगर नाली (10 लाख), आर्य समाज सभागृह, वीरशैव भवन सुशोभीकरण (20 लाख) व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोरील रस्ता लोकार्पण (10 लाख) अशा एकूण 1 कोटी 25 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले.
विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, या शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून शहरातील विविध कार्यालयाच्या इमारती अद्ययावत केल्या आहेत. अनेक रस्ते व नाल्या सिमेंट काँक्रीटची करण्यात आले आहेत. येणा-या कालावधितही शहर विकासासाठी मोठा निधी आणावयाचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शिल्लक राहिलेले कच्चे रस्ते मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असून शक्य तेवढा निधी आणून शहर विकास साधणार आहे. मतदारसंघास भरघोस निधी मिळावा या हेतूनेच सत्तेमध्ये सहभागी झालो आहोत. सत्तेमध्ये सहभागी झाल्याने रखडलेली कामे सुरळीत झाली तर नवीन कामास गती मिळाली असल्याचे मतही आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी अशोकराव चापटे, कमलाकर नळेगावकर, तानाजी राजे, सतीश नवटक्के, इमरोज पटवेगर, महेश देवणे, शाहू कांबळे, अनुराधा नळेगावकर, शिवानी कदम, प्रकाश फुलारी, रविशंकर महाजन, संदीप चौधरी, सय्यद अलीम, सय्यदलाल सय्यद सरवर, बालाजी आगलावे, आशिष तोगरे, फिरोज शेख यांची उपस्थिती होती.
COMMENTS