Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील व्यावसायिकाची एक कोटी 17 लाखांची फसवणूक

पुणे: शहरातील एका व्यावसायिकाची एक कोटी 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनुप्रीत ओरसे याच

CSR फंडाचे आमिष दाखवून गावकऱ्यांची फसवणूक | LokNews24 |
गुंतवणुकीचे आमिष दाखवून 39 लाखांची फसवणूक
वीज पुरवठा खंडित करण्याच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

पुणे: शहरातील एका व्यावसायिकाची एक कोटी 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनुप्रीत ओरसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आदित्य कमलेश श्रीवास्तव (वय 26, रा. विमाननगर) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रीवास्तव यांची मार्केट वेब जेन कंपनी आहे. या कंपनीकडून उत्पादनांचे विपणन केले जाते. आरोपी ओरसेने श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला होता. माझ्या कंपनीकडून देशासह परदेशात विपणनाचे काम केले जाते. आमच्या कंपनीचे काम मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने काही काम तुम्हाला देतो, असे ओरसेने श्रीवास्तवला सांगितले. श्रीवास्तवला व्यावसायिक कामासाठी 40 टक्के परतावा देण्याचे आमिष ओरसेने दाखविले होते. त्यानंतर श्रीवास्तव यांनी त्याला 23 लाख 32 हजार रुपये दिले. ओरसे याने श्रीवास्तव यांच्याकडील रक्कम, तसेच केलेल्या कामाचे पैसे परत केले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्रीवास्तव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

COMMENTS