हेळगाव-तारगाव फाटा रस्ता काम सुरू असताना एका बाजूने खचला

Homeमनोरंजनसातारा

हेळगाव-तारगाव फाटा रस्ता काम सुरू असताना एका बाजूने खचला

हेळगाव-तारगाव फाटा रस्त्याच्या कामाबाबत गेल्या अनेक वर्षापासून बोंबाबोंब सुरु असतानाच ऊस वाहतूकीसह इतर वाहतूकीच्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता खचू लागला आहे.

या दिवशी रिलीज होणार ‘आदिपुरुष’चा जबरदस्त टीझर
मराठी अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन
तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, ०८ एप्रिल २०२२ l पहा LokNews24

काम दर्जेदार व्हावे; ग्रामस्थांची मागणी

मसूर / प्रतिनिधी : हेळगाव-तारगाव फाटा रस्त्याच्या कामाबाबत गेल्या अनेक वर्षापासून बोंबाबोंब सुरु असतानाच ऊस वाहतूकीसह इतर वाहतूकीच्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता खचू लागला आहे. काम पुर्ण होण्याआधीच रस्ता खचू लागल्याने काम दर्जेदार व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

कराड तालुक्याच्या उत्तरेकडील शेवटचे गाव पाडळी (हेळगाव) पासून ते तारगाव फाट्यापर्यंत साधारण सहा ते सात किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या दोन-तीन वर्षापासून रखडले आहे. सर्व स्तरातून अनेक वेळा मागणी करूनही ते सुरू होत नव्हते. सुरू झालेच तर साधारण एक ते दीड किलोमीटरचे अंतरातील रसत्याचे काम अर्धवट स्वरूपात करायचे आणि पुन्हा चार सहा महिने थांबायचे. असे करत दोन तीन वर्षापासून या रस्त्यावरून प्रवास करणार्‍या लोकांना अतिशय खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. सध्या हेळगाव पासून पुढे रस्त्यावर खडी टाकण्याचे काम सुरू झाले. मात्र, सदरील रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत कोणाचे नियंत्रण आहे की नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

साधारण एक किलोमीटरपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर येकाच वेळी खडी पसरून कामाची सुरुवात करण्यात आली. त्यावरुनच मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि उसाने भरलेले ट्रॅक्टर जात असल्यामुळे टाकलेल्या डांबरा सहित मोठी खडी आणि लहान खडी रस्त्याच्या एका बाजूला गेल्याने एका बाजूने संपूर्ण रस्ताच खचलेला आहे. खचलेल्या रस्त्यावरुन लहान खडी टाकून पुढे तसेच काम सुरू करण्यात आले आहे. खचलेल्या रस्त्यावर डांबर आणि मोठी खडी टाकून तो पुन्हा समान पातळीवर दुरुस्त होणे गरजेचे आहे.

COMMENTS