अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे भैय्या बॉक्सर यांना विश्व मानवाधिकार परिषदेच
अहमदनगर (प्रतिनिधी)-
कोरोना काळात हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे भैय्या बॉक्सर यांना विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने महात्मा गांधी मानवता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विश्व मानवाधिकारचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष नवेद शेख यांनी भैय्या बॉक्सर यांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी प्रदेश सचिव सय्यद शफी बाबा, जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अल्ताफ शेख, शहर अध्यक्ष चंद्रकांत उजागरे, अल्पसंख्यक उपाध्यक्ष शाहनवाज शेख, अरुण कोंडके, शरीफ सय्यद, मुफ्ती अल्ताफ मोमीन, जुबेर सय्यद, ललित कांबळे, साजिद पठाण, सादिक सय्यद, मोहसिन शेख आदी उपस्थित होते.
भैय्या बॉक्सर हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटकाळात अनेक गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य केले. कोरोना रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यापासून ते दुर्बल घटकांना किराणा साहित्य पुरविण्याचे त्यांचे कार्य सुरु होते. तसेच त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देखील केली. संस्थेच्या माध्यमातून ते युवकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनद्वारे बंदिवानांसाठी सुरु करण्यात आलेले वाचनालय, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, महापुरुषांच्या जयंती सामाजिक उपक्रम तसेच युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन, गरजू खेळाडूंना प्रशिक्षण, युवक-युवतींना मॉडलिंग व चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध शो चे आयोजन असे अनेक कार्याची दखल घेऊन त्यांना महात्मा गांधी मानवता पुरस्कार देण्यात आला असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष नवेद शेख यांनी दिली. यापुर्वी देखील त्यांना सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले असून, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
COMMENTS