हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पकडली अडीच टन गोमांस वाहतूक करणारी गाडी

Homeमहाराष्ट्रसातारा

हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पकडली अडीच टन गोमांस वाहतूक करणारी गाडी

सातारा जिल्ह्यातील फलटणहुन पुण्याच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारी गाडी हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी थरारक पाठलाग करून पकडली. यामध्ये तब्बल अडीच टन गोमांस आढळून आले आहे.

कुसडगाव ’एसआरपीएफ’ केंद्र व कर्जत डेपोचे उद्या लोकार्पण
शिवसेना भवनसमोर शिवसैनिक – भाजपच्या कार्यतर्त्यांचा जोरदार राडा
जागेच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला | LokNews24


वाठारस्टेशन / वार्ताहर : सातारा जिल्ह्यातील फलटणहुन पुण्याच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारी गाडी हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी थरारक पाठलाग करून पकडली. यामध्ये तब्बल अडीच टन गोमांस आढळून आले आहे. गोमांस आणि गाडी चालक पोलिसांच्या ताब्यात असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासाठी वाठार स्टेशन येथील हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तब्बल सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर व थरारक पाठलागानंतर वाठार स्टेशन येथील वाई चौकात पिकअप पकडण्यात आली. फलटण तालुक्यात राजकीय वरदहस्तामुळे गोवंशाची बेसुमार कत्तली सुरू असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला असून पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.

COMMENTS