Homeताज्या बातम्यादेश

हरियाणात एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय

चंदीगड : हरियाणात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर नायब सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सैनी यांनी चंदीगड येथील सचिवालयात पदभार स्वीका

चांदवड ला पुन्हा रास्ता रोको , शेतकरी रस्त्यावर  
चंद्रयान 3 लाँचसाठी सज्ज
भाजप सत्ता आणि वाद

चंदीगड : हरियाणात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर नायब सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सैनी यांनी चंदीगड येथील सचिवालयात पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत अनुसूचित जाती अर्थात एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध होत असतांना हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.
यावेळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलतांना मुख्यमंत्री सैनी म्हणाले की, राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी मोफत डायलिसिस केले जाईल. भविष्यात वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही ही मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसोबत जाऊन त्यांना सहभागी करून घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. यानंतर सीएम सैनी म्हणाले की, ही आमची पहिली कॅबिनेट बैठक होती. या बैठकीत आमच्या मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला आहे, जो एससीमध्ये वर्गीकरणाचा मुद्दा होता, आमच्या मंत्रिमंडळाने आजपासूनच त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS