हदगाव नगरपरिषद निवडणुकमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हदगाव नगरपरिषद निवडणुकमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार (Video)

हदगाव नगर परिषद निवडणूक ही काही महिन्यांवर आली असता शहरातील नवीन मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार समाविष्ट केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनि

अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील 22 हजार शेतकर्‍यांसाठी 10 कोटी
पेट्रोल पंपावर भीषण स्फोट 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू
भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात 22 शेळ्यासह एक व्यक्ती जखमी

हदगाव नगर परिषद निवडणूक ही काही महिन्यांवर आली असता शहरातील नवीन मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार समाविष्ट केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.सन 2019- 2021 कालावधीत हदगाव शहरांमध्ये नवीन नाव नोंदणी करण्याचा कार्यक्रम शासनाकडून जाहीर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने हदगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील जनतेचे स्थानिकच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी तसेच काही नगरसेवकांनी आगामी निवडणुकांचा विचार करून मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये लोकांची नावे समाविष्ट करून घेतल्याचा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे या निवेदनावर बालाजी पाटील कऱ्हाळे,शैलेश शिरफुले, आराध्या पाटील ,सतीश मोरे , रोहित पंचलवार,नवनाथ पाटील ,यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS