नगर – स्व.दिलीप गांधी यांचे नगरच्या विकासासाठी व अर्बन बँकेच्या विकासा बरोबरच प्रत्येक कार्यकर्ता उभा करण्यात मोठे योगदान आहे. अर्बन बँकेच्या माध
नगर –
स्व.दिलीप गांधी यांचे नगरच्या विकासासाठी व अर्बन बँकेच्या विकासा बरोबरच प्रत्येक कार्यकर्ता उभा करण्यात मोठे योगदान आहे. अर्बन बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार दिला. आज जरी ते नसतील तरी तरी त्यांचे अस्तित्व कायम टिकून आहे. नगर मध्ये उद्दोजाकता निर्माण करण्यासाठी, नवीन पिढीला उद्दोग धंद्यांची जोड देण्यासाठी स्व.दिलीप गांधी यांनी केलेले काम सुवेंद्र गांधी यापेक्षा अधिक पुढे नेतील असा मला विश्वास आहे. अर्बन बँकेच्या पुढच्या चांगल्या भविष्यासाठी दिलीप गांधी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मोठ्या मनाने सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन खा.सुजय विखे यांनी करत दिलीप गांधी यांनी मदत केली नसती तर मीही खासदार झालो नसतो ही वास्तविकता नाकारता येणार नाही. ज्या पद्धतीने गांधी कुटुंबीय माझ्या मागे उभे राहिले त्याच प्रमाणे विखे कुटुंब गांधी परिवारा मागे उभे राहील, अशी ग्वाही दिली.
नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी स्व.दिलीप गांधी प्रेरित सहकार पॅनलच्या सर्व १८ उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती करून बँकेचे ज्येष्ठ सभासद व उद्दोजक श्रीगोपाल धूत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी माळीवाड्या पासून ढोल ताश्यांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढण्यात आली. उद्दोजक मोहन मानधना, श्रीमती सरोज गांधी, पारनेरचे माजी सभापती उमाजी वाळूंज, माजी जी.प.सदस्य विक्रम तांबे, नगरसेवक मनोज कोतकर, भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, बाबू बोरा, विजय मंडलेचा, चेतन जग्गी आदींनी नारळ वाढविले. बँकेच्या सर्व शाखांमधून आलेले सभासद व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करत बाजारपेठेतून प्रचार फेरी काढण्यात आली. केशर गुलाब मंगल कार्यालयात गांधी परिवाराच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्व.दिलीप गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या सभेला खा.सुजय विखे यांनी उपस्थिती लावून सहकार पॅनलला शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातून आलेल्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी यावेळी स्व.दिलीप गांधी यांच्या कार्याचे कौतुक करत उजाळा दिला.
ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते म्हणाले, संघर्षमय पद्धतीने दिलीप गांधी यांनी भाजपाचे काम जिल्ह्यात वाढवले. कार्यकर्त्यांच्या मनात क्रांतीची चिंगारी त्यांनी पेटवली. पूर्वीपासून अर्बन बँक व जिल्ह्याचे राजकारण असे समीकरण आहे. अर्बन बँकेत स्व.दिलीप गांधी यांनी केलेले काम कधीही विसरू शकत नाही. भ्रष्टाचाराचे कितीही आरोप झाले तरी या निवडणुकीत त्यांचे सहकार पॅनल विजयी होणारच.
सहकर पॅनलचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार निवडून आणा हीच स्व.दिलीप गांधी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन करताना श्रीमती सरोज गांधी यांचे डोळे पाणावले.
सुवेंद्र गांधी म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी आमच्यावर केले आहेत. मात्र न्याय देवतेने आम्हाला शसर्त जामीन मंजुर करत न्याय दिला आहे. कायम सत्याचाच विजय होत असतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही आमचा विजय निश्चीत आहे.
अशोक कटारिया यांनी आपल्या भाषणातून विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेत खंडण केले. बिनविरोध निवडून आलेले सुरतचे दिनेश कटारिया, साईदीप अग्रवाल, बंडू रासने, बाळासाहेब महाडिक, ईश्वर बोरा आदींनी मनोगाने व्यक्त केली. बँक निवडणूक प्रचार समितीचे समन्वयक अॅड.राहुल जामदार यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी अर्बन बँकेच्या निवडणुकी साठी सहकार पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यात नगर शहर मधून दीप्ती गांधी, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, राजेंद्र अग्रवाल, ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, महेंद्र गंधे, संपत बोरा, गिरीश लाहोटी. शाखा मतदार संघातून अशोक कटारिया पारनेर, अतुल कसट संगमनेर, कमलेश गांधी शेवगाव व सचिन देसर्डा नेवासा. अनुसूचित जाती जमाती मनेश साठे, महिला राखीव संगीता गांधी, मनीषा कोठारी आदींनी उपस्थितांना अभिवादन केले.
सुमारी दीड वर्षांनी दिवाळी फराळा निमित्त जल्ह्यातील कार्यकर्ते एकमेकांना भेटल्याने याठिकाणी गप्पांचे फड रंगले. अनेकांनी स्व.दिलीप गांधी यांच्या कार्याला व आठवणींना उजाळा दिला.
COMMENTS