स्वायत्त महाविद्यालयांसाठी विद्यापीठाकडून मार्गदर्शक सूचना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वायत्त महाविद्यालयांसाठी विद्यापीठाकडून मार्गदर्शक सूचना

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांपैकी स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. स्वायत

बिहारमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू
खासदार नीलेश लंकेंना आत्ताच उपरती का ?
साई तुझं लेकरू ‘टाइमपास – 3’ मधील पहिले धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांपैकी स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांना प्रत्येक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शुल्क ठरवण्यासाठी समिती नियुक्त करावी लागणार आहे. त्यानुसार स्वायत्तता महाविद्यालयांना शुल्क निर्धारण करावे लागणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने गेल्या काही वर्षांमध्ये विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांपैकी काही महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. त्याअंतर्गत स्वायत्त महाविद्यालयांना नवे अभ्यासक्रम सुरू करता येतात. परीक्षा पद्धतीमध्ये बदल करता येतात. या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयांतील नवीन अभ्यासक्रम, शुल्क रचना आदी प्रशासकीय कामकाजासंदर्भातील मार्गदर्शक सूचना विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. शुल्क निश्चित करण्यासाठी समिती आवश्यक करण्यात आले आहे.

कोणत्याही स्वायत्त महाविद्यालयाला थेट पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही. महाविद्यालयांना इतर स्वायत्तता दर्जा प्राप्त महाविद्यालयातील किंवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीच्या द्वितीय वर्षात प्रवेश देता येईल, असे विद्यापीठाचे उपकुलसचिव एम. व्ही. रासवे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

COMMENTS