स्वातंत्र्याची भीक मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याचे विक्रम गोखलेंकडून समर्थन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्याची भीक मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याचे विक्रम गोखलेंकडून समर्थन

पुणे : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आह

आ.क्षीरसागर यांच्याकडून विकास कामाचा शुभारंभ
माननीय पंतप्रधान मोदींजींच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भरतेकडे : डॉ भारती पवार
Ahmednagar : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्यावर भीषण अपघात (Video)

पुणे : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. ”भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले”, असे कंगना म्हणाली होती. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या व वादंग निर्माण झाला. आता कंगनाच्या या वक्तव्याचे विक्रम गोखले यांनी समर्थन केल्याने, नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलतान गोखलेंनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुकही केले आणि शिवसेना व भाजपा एकत्र आली तर बरं होईल, असेही बोलून दाखवले.

COMMENTS