स्वतः लस घ्या आणि इतरांना घेण्यासाठी प्रेरित करा : पंतप्रधान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वतः लस घ्या आणि इतरांना घेण्यासाठी प्रेरित करा : पंतप्रधान

लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये गैरसमज आणि अफवा पसरवू नका.

कॅप्टन अभिनंदन वर्धमान ‘वीरचक्राने’ सन्मानित
शिक्षण आणि मदरसा !
वेगळा गट नसून आम्हीच शिवसेना :केसरकर

नवी दिल्ली : लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये गैरसमज आणि अफवा पसरवू नका. तुम्हीही लस टोचून घ्या आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करा. प्रत्येकाने लवकरात लवकर लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’मधून देशवासियांना केले. आज ‘मन की बात’चा ७८ वा भाग होता. 

यावेळी मध्य प्रदेशातील एका ग्रामस्थ राजेश हिरावे यांनी लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला. व्हॉट्सॲपवर आलेल्या मेसेजमुळे आपण घाबरलो आणि लस घेतली नाही, असे ते म्हणाले. याला उत्तर पंतप्रधान मोदींनी नागरिकांमधील लसीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांमध्ये गैरसमज आणि अफवा पसरवू नका. या संदर्भात आपला आणि आपल्या आईचा अनुभव सांगितला. मी आणि माझ्या आईनेही कोरोनावरील लस घेतली आहे. यामुळे घाबरू नका. तुमच्या गावात ज्या काही अफवा पसरल्या आहेत त्यात कुठलेही तथ्य नाही. आपल्या देशातील २० कोटींहून अधिक नागरिकांनी कोरोनावरील लसीचे डोस घेतले आहेत. आपल्याला लसीकरणचा वेग वाढवायचा आहे. अफवांना बळी पडू नका, असेही मोदी म्हणाले.

लसीसाठी शास्त्रज्ञांचे मोठे प्रयत्न

कोरोनावरील लस घेण्यासाठी आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवा. कोरोनावरील लस किती प्रभावी, हे नागरिकांना समजवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांना लस घेण्यासाठी प्रेरित करा आणि लस घेतल्याने काहीही वाईट होत नाही. कोरोना विरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते, असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी धावपटू मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणार्‍या खेळाडूंना पाठिंबा दर्शवून त्यांचे मनोबल वाढवण्याचे आवाहन केले. साताऱ्यातील तिरंदाज प्रविण जाधव पहिल्यांदा ऑलिम्पिकमधील निवडीबद्दल कौतुक केले. भारतीय महिला हॉकी टीमची सदस्य नेहा गोयल हिच्या खडतर प्रवासाविषयीही त्यांनी सांगितले.

कठीण संघर्षानंतर प्रवीण जाधव येथपर्यंत पोहोचले!

ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रवीण जाधवबद्दल ते म्हणाले की, कठीण संघर्षानंतर प्रवीण येथपर्यंत पोहोचले आहेत. प्रवीण हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आई-वडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आई-वडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे.

COMMENTS