प्रतिनिधी : मुंबईईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असा संताप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. यावर भाजपाचे आमदा
प्रतिनिधी : मुंबई
ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असा संताप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
यावर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी टोमणा मारला, ‘यंत्रणांचे अधिकारी काम करत असतील तर यांच्या पोटात दुखण्याचे काय कारण? यंत्रणांच्या कार्यक्षमता विस्तारल्या आहेत
अधिकारी काम करत आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरण तडीला लागत आहेत. राज्यात – देशात नियमांच, कायद्याच राज्य सुरु झाल आहे, मात्र असे झाले की राष्ट्रवादीच्या पोटात दुखायला लागते.’
गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. यामध्ये अनिल देशमुख, भावना गवळी, प्रताप सरनाईक अशा काही नेत्यांची नावं आहेत.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तर ईडीने लुकआऊट नोटीस बजावली आहे. मात्र, अजूनही अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असा संताप व्यक्त केला आहे.
शरद पवारांना उत्तर देतांना भाजपाचे आशिष शेलार म्हणालेत की “स्वतच्या पक्षाच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची, गैरकारभाराची प्रकरण लपवता येत नसतील तर हे यंत्रणांवर दोष देतात.
आईने अभ्यास कर म्हटल्यावर आई चांगल सांगत आहे, हे म्हणण्याऐवजी स्वत:चे अवगुण लपवन्यासाठी आई जाच करते असे म्हणण्यासारखे हे आहे.”
शरद पवार यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकारी बँकासंदर्भातल्या धोरणावर टीका केली होती. काही ठराविक बँकाचेच देशात अस्तित्वात राहील, अशा पद्धतीचं धोरण रिझर्व्ह बँकेने स्वीकारले आहे.
यावर शेलार म्हणाले, सहकार क्षेत्राच्या मजबुतीच काम सुरू आहे. ‘आले माझ्या मना’ या पद्धतीने सहकारातील संस्था देशोधडीला लावण्याच काम काँग्रेस, राष्ट्रवादीने केले.
या नेत्यांना आणि पिलावळीला वेसण बसली म्हणून या नेत्यांची अडचण झाली आहे. स्वैराचार करण्याची मुभा द्या, कायद्याच्या चौकटीत बसायच नाही! अशा स्वरुपाच हे विधान आहे.
COMMENTS