गरोदरपणात आपल्या शारीरिक व मानसिक स्थितीत अनेक प्रकारचे बदल होत असतात. अशावेळी खाण्यापिण्याच्या सवयींवर आपण अधिक लक्ष देतो . प्रसूतीपूर्व आपल्या आरोग
गरोदरपणात आपल्या शारीरिक व मानसिक स्थितीत अनेक प्रकारचे बदल होत असतात. अशावेळी खाण्यापिण्याच्या सवयींवर आपण अधिक लक्ष देतो . प्रसूतीपूर्व आपल्या आरोग्यात बदल होतात तसेच आपल्या त्वचेवर देखील बदल जाणवतात. शरीराचे सौंदर्य आपल्या सर्वांना जपायला आवडते. प्रसुतीमध्ये आपल्या पोटावर स्ट्रेच मार्क्स(Stretch marks) येतात. तसेच पोटाला सतत खाज लागते. हे स्ट्रेच मार्क्स प्रसूतीनंतर देखील तसेच राहतात. त्यामुळे त्याचे व्रण,(Ulcer) सुरकुत्या(Wrinkles) दिसू लागतात. शरीरात होणाऱ्या बदलामुळे त्वचेवर ताण आल्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात . प्रसतूतीनंतर साडी नेसल्यानंतर पोटावर मार्क्स दिसतात . तर ते घालवण्यासाठी आपण काय करू शकतो हे जाणून घेऊयात .
गरोदरपणात शारीरिक व मानसिक स्थितीत अनेक प्रकारचे बदल होतात.
प्रसुतीमध्ये आपल्या पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात .
स्ट्रेच मार्क्सपासून सुटका मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी क्रीम, तेलाचा वापर करणे.
स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या.
स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाणे.
रेटिनॉलचा वापर करुन स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होऊ शकतो
रेटिनॉल मध्ये जीवनसत्त्व ए आढळते .

१. गरोदरपणात महिलांचे वजन वाढू लागते. त्यामुळे आपल्याला पोटाच्या आजूबाजूचा भाग वाढू लागतो. त्यामुळे पोटावर व कमरेवर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. हे मार्क्स अधिक जास्त असल्यामुळे क्रीम, तेलाचा वापर करु शकतो. त्यामुळे ते कमी होऊ शकतात. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर(Moisturizer) वापरल्यास त्वचेमध्ये क्रीम व तेल चांगल्या प्रकारे प्रवेश करते आणि त्वचा मऊ , कोमल ठेवते.

2. स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या , विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ खा आणि नियमित व्यायाम करा ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते . महिलांनी गरोदरपणात बदामाच्या तेलाने त्यांच्या त्वचेची मालिश केल्यास डाग कमी होण्यास मदत होते .

३. रेटिनॉलचा वापर करुन आपण स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होऊ शकतो . रेटिनॉल(Retinol) मध्ये जीवनसत्त्व ए आढळते. जे स्ट्रेच मार्क्स बरे करण्यासाठी आवश्यक असते.

COMMENTS