सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई व्हावी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई व्हावी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून राजाभाऊ कोठारी यांच्या मारहाण प्रकरणास जातीय वळण देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणार्‍य

जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील
महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला -आ.अरुणकाका जगताप
खरीप पिके झाली उध्दवस्त, शासनाने भरपाई द्यावी

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून राजाभाऊ कोठारी यांच्या मारहाण प्रकरणास जातीय वळण देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची व शहरातील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली. 

यावेळी आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष नईम शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, आफताब बागवान, संतोष पाडळे, संदीप वाघचौरे, जावेद सय्यद आदी उपस्थित होते.

शहरामधील एका अल्पवयीन मुलीने युवकाच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आरपीआयच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर मुलीस श्रध्दांजली वाहून आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.  रामचंद्र खुंट येथे राजाभाऊ कोठारी यांना मारहाण प्रकरणानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जातीयवादी प्रवृत्ती व संघटना जातीय तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारीत करत आहे. 

यामुळे शहरात दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. सदर मारहाण प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 307 कलम प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये काही आरोपी अटक देखील करण्यात आले आहेत. सदर घडलेली घटना ही निंदनीय आहे. परंतु सदर घटनेमुळे एका समाजाला टार्गेट केले जात आहे. काही जातीयवादी संघटना दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सातत्याने करत आहे. सोशल मीडियामध्ये चुकीचे मेसेज व्हायरल करुन युवकांना भडकविण्याचे काम सुरु आहे. या घटनेचे समर्थन कोणत्याही समाजातील व्यक्तीने केलेले नाही. ही घटना जातीय द्वेषातून घडली नसून, एका समाजाला टार्गेट करणे चुकीचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

तसेच देशामध्ये युवती व महिलांवर बलात्कार, अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महिलांवर होणार्‍या अत्याचार रोखण्यासाठी कायद्यामध्ये बदल करून, आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपी कोणत्या जाती-धर्माचा आहे. हे महत्त्वाचे नसून त्यांनी केलेले अमानवी कृत्य लक्षात घेऊन त्याला कठोर शासन होण्याची गरज असल्याचे आरपीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS