जम्मू : भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी जिहादी दहशतवाद्यांचा डाव भारतीय सैन्याने उधळून लावला आहे. हे दहशतवादी जम्मू-
जम्मू : भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी जिहादी दहशतवाद्यांचा डाव भारतीय सैन्याने उधळून लावला आहे. हे दहशतवादी जम्मू-काश्मिरातील पुंछ सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्न होते. यासंदर्भात सैन्याच्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सैन्याने गुरुवारी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. दहशतवादी पुंछ सेक्टरमध्ये नियत्रंण रेषेजवळ भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय सैन्यांकडून तत्काळ गोळीबार सुरू करण्यात आला. भारतीय सैन्य सतर्क असल्याचे दिसताच या जिहादी दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. अशीच एक घटना पंजबामध्ये घडली आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमेवरून घुसखोरी करताना तीन पाकिस्तानी तस्करांना बुधवारी रात्री रोखले. सीमेवर संशयास्पद हालचाल सुरू होताच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी तस्करांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी एका तस्कराला अटक करण्यात यश आले आले. त्याच्याकडून अमली पदार्थांचे दोन पॅकेट जप्त करण्यात आले आहेत. पाकमधून कायम रात्रीच्या वेळी दुर्गम भागातून भारतीय सीमेत घुसखोरी होते. दहशतवादी जमिनीखाली भुयार खोदून भारतीय सीमेत घुसखोरी करतात. पाकव्याप्त काश्मीर भागात सुमारे 200 ते 250 दहशतवादी तळ कार्यरत असून येथील दहशतवादी भारतात प्रवेश करण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली होती. मात्र, सीमेवरील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय सैन्य सतर्क, सावध आणि सज्ज आहे.
COMMENTS