सैनिक बँकेतील सभासद वाढ बेकायदेशीर; सहकार मंत्र्याकडून पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगिती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैनिक बँकेतील सभासद वाढ बेकायदेशीर; सहकार मंत्र्याकडून पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगिती

पारनेर प्रतिनिधी : सैनिक बँकेतील चेअरमन  शिवाजी व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व काही संचालक,कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपलाच पॅन

खंडणी मागणार्‍याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करा ; व्यावसायिकांची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज सकारात्मक विचारांचे विद्यापीठ – स्वाती कोयटे
श्री खोलेश्‍वर देवस्थानची यात्रोत्सवाची कुस्त्यांच्या हंगाम्याने सांगता

पारनेर प्रतिनिधी : सैनिक बँकेतील चेअरमन  शिवाजी व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व काही संचालक,कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपलाच पॅनल निवडून यावा हा उद्देश ठेवत व बँकेचा पोटनियमाचे उल्लंघन करत एकाच दिवशी तब्बल१४०५ नातेवाईक सभासद केले होते याविरुद्ध सैनिक बँकेचे सभासद बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी,सुदाम कोथिंबीरे,संपत शिरसाठ,बबन दिघे,यांनी सहकार मंत्र्याकडे अपील दाखल केले होते. तूर्त सभासद बेकायदेशीर ठरविण्यात आले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती देण्यात आले आहे.           

म.स.सं अधिनियम १९६० च्या कलम १५४ अन्वये पुनरिक्षण अर्जावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढे १३ जुलै २०२१ ला सहकार खात्याचे आधिकारी, बँक आधिकारी, व तक्रारदार बाळासाहेब नरसाळे व तक्रारदार यांच्या वतीने विधितज्ञ आयेशा केशोडवाला  यांची एकत्रित सुनावणी झाली होती. सैनिक बॅंक कर्मचारी,चेअरमन व काही संचालकांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन व बँकेच्या पोटनियमाचे व कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन करत नियमबाह्य सभासद केल्याचे सहकार मंत्र्यांच्या निदर्शनात विधीतज्ञ आयेशा केशोडवाला यांनी आणून दिले. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सदर मुद्यावर व कायदा व बँक पोटनियमाचे अवलोकन केले असता असा निष्कर्ष काढला की बँकेने केलेली सभासद वाढ ही कायद्यातील तरतूद व बँकेच्या उपविधीचे उल्लंघन करत  बेकायदेशीरपणे केली आहे.त्यामुळे बेकायदेशीर झालेल्या सभासदांना  पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगिती दिली असून पुढील सुनावणी २१ सप्टेंबर २०२१  रोजी ठेवण्यात आली आहे.सैनिक बँकेत सत्ताधाऱ्यांनीं लोकशाहीचा अवमान करत बेकायदा,नियमबाह्य सभासद प्रक्रिया राबवून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले होते. “हम करे सो कायदा” अशा प्रकारची निती संचालक मंडळाने अवलंबली होती मात्र सहकार मंत्राने स्थगिती देऊन सत्ताधाऱ्याच्या या नीतीला पायबंद घातला आहे.
चौकट- बँक कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी!
सैनिक बँकेच्या संचालक मंडळाची आगामी  निवडणूक डोळ्यासमोर ठेवत व केलेल्या गैरकारभार दडपण्यासाठी चेअरमन शिवाजी व्यवहारे,  संजय तरटे, शिवाजी सुकाळे, नामदेव काळे, मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे,अनिल मापारी, रमेश मासाळ, संतोष भनगडे,आप्पा थोरात,राजेंद्र ढवण, आकाश काकडे,बबन फंड,भरत पाचारणे, सदाशिव फरांडे या कर्मचाऱ्यांनीं १४०५ नातेवाईकांना सभासद केले  मात्र सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने चेअरमन, मुख्यकार्यकारी आधिकारी,व कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.

COMMENTS