“सेवा ही संघटन या विचाराने कोपरगाव मतदारसंघात भाजपाने साजरा केला ७ वा वर्षपूर्ती दिवस”

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

“सेवा ही संघटन या विचाराने कोपरगाव मतदारसंघात भाजपाने साजरा केला ७ वा वर्षपूर्ती दिवस”

देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळास सात वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सेवा हि संघटन या उपक्रमा मार्फत भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.आमदार सौ.स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील व शहरातील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,गट

पद्मकांत कुदळे व शिलाताई कुदळे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
भाडोत्री दिलेली रिक्षा पळवली
संजीवनीच्या सहा प्राध्यापकांना डॉक्टरेट पदवी

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळास सात वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सेवा हि संघटन या उपक्रमा मार्फत भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.आमदार सौ.स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील व शहरातील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,गट प्रमुख,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या कोरोनाच्या महामारीत नियम व अटींचे पालन करुन तालुक्यातील व शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवुन तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी योध्यांचा  सॅनिटायझर,मास्क व आरोग्य उपयोगी साहित्य देउन सत्कार केला.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंतप्रधान पदाचा ७ वर्षाचा कार्यकाळ अतीशय सेवाभाव वृत्तीने सुरू आहे.अतिशय महत्वपूर्ण योजना केंद्र सरकार राबवत असून देशाच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल या सात वर्षात झालेले दिसून येतात.शेतकरी बांधवांना सन्मान निधी सुरू करणारे आदर्श सरकार व शेतकरी हिताचे निर्णय वेळप्रसंगी कटुता स्विकारून कृषी क्षेत्राच्या उज्वल भविष्यासाठी राबविण्याचे काम नरेंद्रजी मोदी यांनी केले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणारे महत्वाचे निर्णय व भारताचा निर्माण केलेला दरारा याचा कोरोना काळात देशाला मिळणारे परराष्ट्रीय सहकार्य हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्याचा प्रभाव असल्याचे संपूर्ण देशाने अनुभवले आहे.आदर्श कार्यपद्धती असणारी सु-शासन व्यवस्था मोदीजींच्या काळात निर्माण झाली आहे.त्यामुळेच या दिवसाचे औचित्य साधून भाजपा कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,शहराध्यक्ष दत्तात्रय काले,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

COMMENTS