परभणी- पदाचा व अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन जिल्हाधिकारी राधीका रस्तोगी यांच्या आदेशानुसार तलाठी डी. एस. कदम यांच्यावर दाखल झालेल्
परभणी- पदाचा व अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन जिल्हाधिकारी राधीका रस्तोगी यांच्या आदेशानुसार तलाठी डी. एस. कदम यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हयातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे . या संदर्भातील निवाडा परभणीचे मुख अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तथा पिठासीन भा.भा.शेळके यांनी नुकताच दिला .
त्कालीन जिल्हाधिकारी राधीका रस्तोगी यांच्या कार्यकाळात असलेले तहसिलदार श्रीरंग कोकाटे यांनी 24 जून 2003 रोजी नवामोंढा ठाण्यात तलाठी कदम यांच्या विरुद्ध भारतीय संहिता 1860 चे कलम 466,468 आणि 471 सह 340 नुसार गुन्हा दाखल केला होता . त्यानुसार त्यांच्यावर दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करणे , बनावट अभिलेखे तयार करणे , मुळ सातबारात खाडाखोड करणे, फेरफार मंजुर नसतांना सातबारावर अंमल घेणे , सातबाराच्या क्षेत्रामध्ये आकारबंदा प्रमाणे वाढ व घट न करता स्वतःच्या अधिकारात क्षेत्र कमी जास्त करणे , अशा प्रकारचे गंभीर आरोप लावण्यात आले होते . सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरिक्षक एस . एस . राठोड यांनी केला . दरम्यान , 11 सप्टेंबर 1976 ते 2002 दरम्यानच्या तलाठी डी. एस. कदम यांच्या कार्यकाळात कुठल्याही प्रकारच्य बनावट नोंदी , फेरफार दस्तावेज केल्याचे सरकारी पक्षाकडून सिद्ध झाले नाही . शासनाची आणि खाजगी व्यक्तींना फसवण्यासाठी बनावट सातबारा तयार केल्याचेही सिद्ध करता आले नाही. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक अभियोक्ता एम.पी. कुलकर्णी व अँड . डि.एस नाटकर तर तलाठी डी. एस. कदम यांच्या बाजूने प्रसिद्ध वकील अॅड . एस.एस.सावरगावकर व प्रसिद्ध वकील अॅड . एम . ए . बागल यांनी युक्तीवाद केला . 20 सप्टेंबर 2021 रोजी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी भा.भा. शेळके यांनी तलाठी डी.एस. कदम व पंडितराव जोगवाडकर यांची भादवि 1860 चे कलम 466,468 आणि 471 , 34 अन्वये दाखल केलेल्या गुन्हयाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करीत कलम 437 ( अ ) नुसार प्रत्येकी 7,500 रुपयांचे वैयक्तीक बंधपत्र व तेवढ्याच रक्कमेचा जामीन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत .
COMMENTS