सुविधांबरोबर मनुष्यबळही वाढवा  प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुविधांबरोबर मनुष्यबळही वाढवा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मागणी

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन ससूनमध्ये प्रशासनाने बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे; पण बेड वाढवण्याबरोबरच मनुष्यबळ, मेडिकल साहित्य, ऑक्सिजन, हे वाढवण्यावर लक्ष दिले जात नाही.

यशोमती ठाकूरांची अधिकाऱ्यांनी धमकी
पुण्यातून सात महिन्याच्या बाळाची चोरी
महाराष्ट्र केसरी आणि चर्चा ! 

पुणे/प्रतिनिधी: कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन ससूनमध्ये प्रशासनाने बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे; पण बेड वाढवण्याबरोबरच मनुष्यबळ, मेडिकल साहित्य, ऑक्सिजन, हे वाढवण्यावर लक्ष दिले जात नाही. म्हणून येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मनुष्यबळ वाढवण्याची मागणी केली आहे. 

पालकमंत्री अजित पवार यांनी ससूनमध्ये बेड वाढवणार नाही, असे जाहीर केले होते; परंतु आमच्यापर्यंत लेखी निर्णय पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही केवळ क्रिटिकल सेवा पुरवू, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच डॉक्टरांच्या काही मागण्यांकडेही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात उमटतील, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. सध्या ससूनमध्ये 550 कोरोना आणि 450 इतर रुग्ण आहेत; मात्र निवासी डॉक्टरांची संख्या केवळ 450 आहे. आणखी 300 बेड वाढवले, तर शंभर डॉक्टरांची गरज भासणार आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच आहोत. रुग्णसेवा अविरत चालू आहे. गेल्या एक- दीड महिन्यापासून आमच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. प्रशासन त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. डॉक्टरांच्या सर्व अडचणी आणि त्यावरील उपायही आम्ही प्रशासनाला सुचवून दिले आहेत; पण ते याची दखल घेत नाहीत, या डॉक्टरांनी सांगितले. 

COMMENTS