सुळा डोंगराचे उत्खनन कायमस्वरूपी थांबवणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुळा डोंगराचे उत्खनन कायमस्वरूपी थांबवणार

नाशिक/प्रतिनिधी गावाच्या शेती व पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुळा डोंगराचे जीवघेणे उत्खनन कायमस्वरूपी थांबवण्यासाठी येत्या २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेत ठरा

यंदा 132 दिवस उच्च न्यायालयाची दारे बंद
सुसज्ज बस स्थानक होणार प्रवाशांसाठी उपलब्ध
बुलढाण्यात बस-कंटेनरचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार

नाशिक/प्रतिनिधी

गावाच्या शेती व पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुळा डोंगराचे जीवघेणे उत्खनन कायमस्वरूपी थांबवण्यासाठी येत्या २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेत ठराव करून तो शासनाला पाठवला जाईल,तसेच यापुढे मातोरी शिवारात शेती व निसर्गाला हानी पोहोचवणारे उत्खनन होणार नाही,असे मातोरी(ता नाशिक) येथील सरपंच दिपक हगवणे यांनी व्यक्त केले.

मातोरी ग्रामपंचायत मध्ये नाशिकच्या ब्रम्हगिरी टास्क फोर्स व शिवकार्य गडकोट संस्था,व पर्यावरण संस्थांच्या वतीने सुळा डोंगर उत्खनन थांबवण्यासाठी योग्य पाठपुरावा घेणारे येथील युवा सरपंच दिपक हगवणे यांचा शाल,श्रीफळ,स्मृती चिन्ह,गडकोट संवर्धन पुस्तिका देऊन सस्नेह सन्मान केला,याप्रसंगी ते बोलत होते,पुढे बोलताना त्यांनी प्रत्येक गावाने आता पुढाकार घेऊन आपले भविष्य,शेती, पर्यावरण,डोंगर वाचवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

जर आपण दुर्लक्ष केले तर हवामान संतुलन टिकणार नाही,प्रसंगी आपण अडचणीत येऊ,मला पर्यावरण मित्र,पत्रकार,पर्यावरण मित्र व ग्रामपंचायत ने बळ दिले यामुळं मी निर्भयपणे पुढे आलो.आता ही मोहीम निरंतर असेल असे ते म्हणाले,हा कार्यक्रम कोरोना नियम पाळून झाला,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पर्यावरण मित्र रमेश अय्यर होते,यावेळी अय्यर यांनी निसर्गाचा घात करणाऱ्या व्यवस्थाना तोंड देतांना आलेले अनुभव,घेतलेली ठोस भूमिका मांडली,

तर,शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक,तथा टास्क फोर्सचे सदस्य राम खुर्दळ यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवरायांच्या अज्ञापत्राचा विचार मांडला,सह्याद्रीच्या रांगेला गडकिल्ल्यांचे सामर्थ्य मिळऊन दिले त्यांनी गडकोटांच्या भूमीत स्वराज्य स्थापन केले त्यातून निसर्गरक्षण,पर्यावरण,रोजगार,कौशल्य,त्याग,विरता,पाण्याचे मोल शिकवले.सध्या डोंगर,गडकिल्ल्यांच्या माथ्यावर,पायथ्याशी खाणकाम,खोदकाम,बांधकामे वाढली आहेत,

लाकूडतोड,वणवे,कोसळनाऱ्या दरडी यामुळं मानवी व पर्यावरणीय अपरिमित हानी होत आहे,नैसर्गिक टेकड्या ही सपाट केल्या जात आहे,हे थांबवण्यासाठी लोकचळवळ व्हावी.यावेळी जिल्हा ग्रामविकास मंचचे सुरेश भोर यांनी ७३ व्या घटना दुरुस्ती हा मोठा अधिकार आहे,त्या अधिकाराने ग्रामपंचायती व गावाने आपले शिवार व त्यातील निसर्ग,डोंगर,टेकड्या वाचवल्या पाहिजे,

यावेळी रमेश अय्यरसर,गोदावरी गटारीकरन विरोधी मंचचे निशिकांत पगारे,ग्रामविकासाचे अभ्यासक अँड प्रभाकर वायचळे,दरीचे उपसरपंच अरुण दोंदे,माजी सरपंच शरद तांदळे,त्रंबक काकड,वारकरी आबा मुरकुटे,सीताराम पिंगळे,किरण कातड,वृक्षवल्लीचे प्रसाद भामरे,ब्रम्हगिरी कृती समितीचे मनीष बाविस्कर,गरूडझेपचे संदीप भानोसे,पत्रकार सुरेश भोर,जितेंद्र साठे,शिवकार्यचे राम खुर्दळ,राजू शिरसाठ,संदेश राहणे,यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी,ग्रामस्थ, पदाधिकारी हे उपस्थित होते,

COMMENTS