सुरुल येथे ऊसाच्या फडात बिबट्याचे तीन बछडे

Homeमहाराष्ट्र

सुरुल येथे ऊसाच्या फडात बिबट्याचे तीन बछडे

वाळवा तालुक्यातील सुरुल येथे ऊस फडात तीन बिबट्याचे बछउे सापडले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी सपत्नीक श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
अलविदा स्टेटस ठेऊन डॉक्टरने स्वत:ला संपविले | LOKNews24
सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे

परिसरात घबराटीचे वातावरण 

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुक्यातील सुरुल येथे ऊस फडात तीन बिबट्याचे बछउे सापडले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. कुत्री, शेळ्या, मेंढ्यावर बिबट्याने हल्ले केले होते.

सोमवारी सकाळी रघुनाथ पाटील यांच्या शेतामध्ये ऊस तोड सुरू होती. तोड सुरू असताना मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळले. त्यानंतर रघुनाथ पाटील यांनी ही माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. बिबट्याचे बछडे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

वनविभागाचे सुशांत काळे म्हणाले, पिल्ले ताब्यात घेऊ शकत नाही. पिल्ले ऊसाच्या फडात आहे तेथेच ठेवली जाणार आहेत.  नागरिकांनी एकटे बाहेर पडू नये, रात्रीच्या वेळी बॅटरीचा वापर करावा, मोबाईल वरती संगीत लावावे. या परिसरात बिबट्याचे बछडे असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी. 

COMMENTS