मुंबई : कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करत असून, त्यांची ही कृती अन्यायकारक आणि मानवताविरोधी आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिका
मुंबई : कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करत असून, त्यांची ही कृती अन्यायकारक आणि मानवताविरोधी आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबवून, तेथील गावे महाराष्ट्रात सामील करून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले आहे. अजितदादांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्रं लिहून ही मागणी केली आहे.
कर्नाटकातील सीमाभागात शेकडो मराठी भाषिक गावे आहेत. त्यांचे असंख्य प्रश्न आहेत. त्यांना महाराष्ट्रात सहभागी होण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र मराठी भाषिकांची बाजू सर्वोच्च न्यायालयात देखील मांडण्यात आली आहे. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात देखील लढली जात आहे. मात्र तरी देखील हा प्रश्न निकाली निघालेला नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन 60 हून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत, याकडे अजित पवार यांनी मोदींचे लक्ष वेधले आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे. सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी, अशी विनंतीही त्यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली आहे. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे. हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा देऊन सीमाभागातील मराठी बांधवांना पंतप्रधानांनी न्याय द्यावा, अशी महाराष्ट्रवासियांची इच्छा असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी मराठी भाषिकांना न्याय द्यावा
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी, अशी विनंती अजित पवार यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्र वासियांचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात पंतप्रधानांनी न्याय द्यावा, अशी महाराष्ट्रवासियांची इच्छा असल्याचे अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
COMMENTS