सीबीएसस्सीच्या दहावीच्या परीक्षा रद्द ; बारावीच्या परीक्षा लांबणीवर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीबीएसस्सीच्या दहावीच्या परीक्षा रद्द ; बारावीच्या परीक्षा लांबणीवर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने सीबीएससीच्या अर्थात केंद्रीय परीक्षा मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

राज्यात ३.१४ लाख कोटीची विक्रमी परकीय गुंतवणूक -उपमुख्यमंत्री फडणवीस
आता महाराष्ट्रातचं रेमडेसिव्हीर निर्मिती
स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येणार : मंत्री विजय वडेट्टीवार

नवीदिल्लीः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने सीबीएससीच्या अर्थात केंद्रीय परीक्षा मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे दहावीचे विद्यार्थी परीक्षा न देताच थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत, तर  या मंडळाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात एक जून रोजी पुनर्विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. परीक्षा घेणार असल्यास त्याच्या 15 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. जे विद्यार्थी या निर्णयावर समाधानी नसतील, त्यांना परीक्षा देता येईल. 

सीबीएससीच्या बारावीच्या परीक्षा 4 मे ते 14 जूनपर्यंत होणार होत्या. त्या टाळण्यात आल्या. यावर एक जून रोजी पुनर्विचार करून निर्णय घेतला जाईल. परीक्षा असल्यास 15 दिवस अगोदर कळवले जाईल. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या परीक्षा सुद्धा चारमे पासून सुरू होणे अपेक्षित होते. आता सीबीएससीच्या  दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच थेट अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे. जे विद्यार्थी आपल्या निकालावर समाधानी नसतील, त्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. या परीक्षा कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर घेतल्या जातील. पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या बैठकीत बुधवारी दुपारी हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी अनेक राज्य सरकारांनी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामध्ये पंजाब आणि दिल्ली सरकारचा समावेश होता. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या वतीने या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरण्यात आली. संघटनेकडून शिक्षण विभागाला पत्रदेखील पाठवण्यात आले होते. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी कॅम्पेनसुद्धा चालवले. सीबीएससी बोर्डाच्या एकूण 30 लाख विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा दिली जाणार होती.

महाराष्ट्रात आधीच निर्णय

कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारनेसुद्धा परीक्षा रद्द करून थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. कोरोनाने महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. अशात राज्य सरकारांकडून राज्य परीक्षा मंडळांच्या आणि इतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे. काही राज्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

COMMENTS