सिव्हील सर्जनच्या गाडीने अचानक घेतला पेट…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हील सर्जनच्या गाडीने अचानक घेतला पेट…

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या शासकीय वाहनाने सोमवारी (1 नोव्हेंबर) सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास अचानक पेट

नितीन गडाख यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार
वंचितच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देणार ः निलेश गायकवाड                                    
भंगार चोरून नेणारे पाच आरोपी जेरबंद

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या शासकीय वाहनाने सोमवारी (1 नोव्हेंबर) सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली. प्रसंगावधान दाखवत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्‍यांनी आग प्रतिरोधक कीटचा वापर केल्याने कारला लागलेली आग नियंत्रणात आली. मात्र यामुळे जिल्हा रुग्णालयात आग विझवण्यासाठी धावपळ झाली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पोखरणा हे दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून शासकीय कारने (क्रमांक एमएच 16 एन 0477) जिल्हा रुग्णालयात आले. त्यानंतर काही वेळाने ते आपल्या खासगी कारने पुन्हा बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यानंतर काही वेळातच रुग्णालयाच्या दर्शनी भागात उभ्या केलेल्या डॉ. पोखरणा यांच्या शासकीय कारच्या बोनेटमधून धूर आणि आग दिसून आली. बघता-बघता कारच्या पुढील भागातून आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. अचानक कारला आग लागल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. यादरम्यान रुग्णालयात असलेल्या इमर्जन्सी फायर सेफ्टीने वायूचा मारा करत लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले. तसेच मनपाच्या अग्निशमन दलास कळवले असल्याने थोड्यावेळात अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर पुन्हा पाणी मारण्यात आले. आग विझवण्यासाठी रुग्णालयाचे डॉ.मनोज घुगे, कर्मचारी प्रकाश पवार, सागर गायकवाड, भरत काशीद, संजय हंकारे, राहुल माने, प्रदीप ससे, अरविंद सोनवणे आदींनी प्रयत्न केले. प्रसंगावधान दाखवत आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली असली तरी कारचे नुकसान झाले आहे. वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS