सिल्लोड येथे पोलीस बांधवांसाठी प्रतिक्षा कक्षचा शुभारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिल्लोड येथे पोलीस बांधवांसाठी प्रतिक्षा कक्षचा शुभारंभ

पोलीस बांधवांना पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू- राज्यमंत्री अब्दुल सत्तारऔरंगाबाद :- सोयगाव तालुक्यासह जिल्हा पोलिस दलाला

शेतकर्‍यांच्या परवानगीनेच कृषी कायदे लागू होणार ; मंत्री सत्तार यांची ग्वाही
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस घेणे आवश्यक ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार
पुन्हा कोर्टात जाऊ व नाराजी दूर करू : मंत्री सत्तार

पोलीस बांधवांना पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू- राज्यमंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद :- सोयगाव तालुक्यासह जिल्हा पोलिस दलाला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून सोयगाव, फर्दापूर , अजिंठा याठिकाणी पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून येथे सुसज्ज नवीन पोलीस स्टेशन इमारतीसाठी प्रस्ताव सादर करा यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. सिल्लोड येथे पोलीस स्टेशन आवारात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या स्थानिक निधीतून पोलीस बांधवांसाठी प्रतीक्षा कक्ष तसेच सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज शौचालय बांधकामाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक केएमएम प्रसन्ना, प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांझेवार, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. सिल्लोड येथे बंदोबस्तासाठी बाहेरून येणाऱ्या पोलीस बांधवांना राहण्यासाठी जागा नव्हती नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांना सामाजिक सभागृह दिल्या जात होते. यानंतर आता पोलीस स्टेशन आवारातच ही व्यवस्था होणार आहे असे स्पष्ट करीत प्रशासकीय विभागात सर्व सुविधा देवून स्वच्छतेच्या अनुषंगाने नवीन बदल आणावा यासाठी सिल्लोड पोलीस स्टेशन च्या आवारात सुसज्ज असे शौचालय उभारण्यात येत आहे. हा उपक्रम जिल्हाभर राबविणार असून सोयगाव आणि सिल्लोड तहसीलदार यांनी शौचालय संबंधी प्रस्ताव सादर करावा त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून तहसील कार्यालयाच्या परिसरात ही अशाच प्रकारचे शौचालय उभारू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. आपण विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात पुढे असलो तरी कोरोना लसीकरणात सर्वाधिक मागे असल्याची खंत व्यक्त करीत कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे यासाठी प्रशासकीय यंत्रणेने विशेष अभियान राबवावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.

सिल्लोड चा उपक्रम म्हणजे सुरक्षिततेतून स्वच्छतेकडे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे पोलिसांसाठी सर्व सुविधेने परिपूर्ण सुसज्ज असे पोलीस प्रतिक्षालय आणि शौचालय उभारल्या जात आहे. सिल्लोड चा उपक्रम म्हणजे सुरक्षिततेतून स्वच्छतेकडे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले .

COMMENTS