सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 878 रुग्ण; 31 जणांचा मृत्यू

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 878 रुग्ण; 31 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 878 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार
सचिन कोळपे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार
कीर्तनातून सामाजिक प्रबोधनाची गरज ः महेश महाराज काळे


सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 878 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. उपचारादरम्यान 31 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. दरम्यान, कोरोना मुक्त झालेल्या 1 हजार 663 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 103(6900), कराड 222 (20455), खंडाळा 88 (8959), खटाव 150(13129), कोरेगांव 220 (12773), माण 135 (9945), महाबळेश्‍वर 7 (3833), पाटण 46 (5988), फलटण 332 (20283), सातारा 395 (32646), वाई 169 (10833 ) व इतर 11 (912) असे आज अखेर एकूण 1 लाख 46 हजार 656नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे: जावली 3 (151), कराड 6 (593), खंडाळा 0 (122), खटाव 6 (366), कोरेगांव 2 (292), माण 3 (194), महाबळेश्‍वर 0 (42), पाटण 0 (145), फलटण 2 (241), सातारा 8 (958), वाई 1 (286) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 3 हजार 390 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS